Share

Nitesh Rane | “माझ्या विचारांचा सरपंच आला नाही तर…”; नितेश राणेंची मतदारांना जाहीर धमकी

Published On: 

🕒 1 min read

Nitesh Rane | सिंधुदुर्ग : गेल्या काही दिवसांपासून भाजप नेत्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे राज्यातील वातावरण तापले आहे. यामध्ये आता भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी भर टाकत कणकवली तालुक्यातील नांदगाव येथील ग्रामस्थांना थेट धमकीच दिली आहे.

भाजपचे आमदार नितेश राणे (Nitesh Rane) म्हणाले की, “चुकून पण इथे माझ्या विचाराचा सरपंच आला नाही, तर मी एकही रुपयाचा निधी देणार नाही.” ऐवढी काळजी मी निश्चितपणे घेईल.” आगामी ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते.

पुढे ते म्हणाले, त्यामुळे मतदान करताना आता नीट विचार करा, कारण आता निधी वाटप माझ्या हातात आहे. जिल्हा नियोजन समितीचा निधी असो, ग्रामविकासचा निधी असो की 25 पंधराचा निधी असो, केंद्र सरकारचा निधी असो, कारण मी सत्तेत असलेला आमदार आहे.

“पालकमंत्री असो की जिल्हाधिकारी असो संबंधित कुठलाही मंत्री असो उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री असतील कुणीही मला विचारल्याशिवाय नांदगावमध्ये निधी देणार नाही. हा विषय तुम्ही सरळ स्पष्ट समजून घ्या. जर नितेश राणेच्या विचारांचा सरपंच आला नाही तर इथे विकास होणार नाही, निधी येणार नाही हे सरळ स्पष्ट आहे”, असंही नितेश राणे यावेळी बोलताना म्हणाले.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!