मुंबई : अमृता फडणवीस यांनी कित्येकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. उद्धव ठाकरे यांनीही त्यांच्या टीकेला टीकेत अनेकदा प्रत्युत्तर दिलेत. उद्धव ठाकरे-अमृता फडणवीस यांच्यात रंगलेल्या सामन्यावरच देवेंद्र फडणवीस यांना आज पत्रकारांनी प्रश्न विचारला त्यावर फडणविसांनी मिश्किल पद्धतीने पतिक्रिया दिली आहे.
अमृता फडणवीस यांच्या गायनावरुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांना टोला लगावला होता. “राज्याचे मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव हे चांगलं गातात असं मला आदित्यने सांगितलं होतं. आजपर्यंत एकच व्यक्ती गाते, असं मला वाटत होतं,” असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी अमृता फडणवीस यांचं नाव न घेता त्यांना टोला लगावला. त्यावर अमृता फडणवीस यांनीही उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर दिले होते. मला वाटलं होतं, अब्जाधिश फक्त आपणच आहात, आता कळलं आपल्या बायकोचा भाऊ सुद्धा अब्जाधीशच आहे, असं त्या म्हणाल्या.
उद्धव ठाकरेंनी अमृता फडणवीस यांच्या गायनाची थट्टा केली. त्यावर अमृता फडणनीस यांनी ठाकरेंच्या मेहुण्याची चेष्टा केली, असा प्रश्न पत्रकारांनी देवेंद्र फडणवीस यांना विचारला. त्यावर फडणवीस म्हणाले, “राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि माझी पत्नी अमृता फडणवीस यांच्यामध्ये एक साम्य आहे. उद्धवजी, टोमणे मारायचे सोडत नाहीत आणि माझी पत्नी नको त्या गोष्टींवर बोलणं सोडत नाही”.
महत्वाच्या बातम्या –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

