Share

“…तर महाराष्ट्रावर उपकार होतील”, राज ठाकरेंच्या ‘त्या’ आव्हानाला संजय राऊतांचे प्रत्युत्तर

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी काल (३ मे) एक पत्रक प्रसिद्ध करत “आम्ही आमचा हट्ट सोडणार नाही, त्यांना एकदा हनुमान चालीसा ऐकवाच” असे म्हटले आहे. यातून त्यांनी भोंग्याबाबत भूमिका मागे घेण्यास साफ नकार दिला आहे. तसेच “महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आम्ही आवाहन करतो की, कै. हिंदूहदयसम्राट, शिवसेनाप्रमुख श्री. बाळासाहेब ठाकरे यांनी कित्येक वर्षांपूर्वी सर्व भोंग बंद झालेच पाहिजेत, हे सांगितलेलं आपण ऐकणार आहात; की तुम्हाला सत्तेवर बसवणाऱ्या बेगडी धर्मनिरपेक्षतावादी शरद पवार साहेब यांचे ऐकणार आहात? याचा फैसला महाराष्ट्रातील जनतेसमोर एकदाचा होऊन जाऊ दे.”, असेही राज ठाकरे यांनी म्हटले आहे. यावरच शिवसेना खासदार संजय राऊत (sanjay raut) यांनी प्रत्युत्तर दिले आहे. ते आज माध्यमांशी संवाद साधत होते.

“हे प्रचंड बकवास वक्तव्य आहे. त्या वक्तव्याचा अर्थ कुणाला कळतो का? सर्व भोंगे बंद व्हायला हवेत म्हणजे काय? रात्रभर गावात भजन-कीर्तन सुरू असतं. ते बंद करायचं का? जरा डोकं ठिकाणावर ठेवून यावर वक्तव्य केलं तर महाराष्ट्रावर उपकार होतील. सर्व भोंगे बंद करा असे बाळासाहेब कधीच बोललेच नाही. राज्यात, देशात सर्व धर्मीयांचे काही ना काही कार्यक्रम सुरूच असतात. तुम्हाला ते बंद करायचे आहेत का? तुमचे मास्तर जे तुम्हाला हिंदुत्वाचे धडे देत आहेत त्यांची डिग्री तपासून घ्या. ती डिग्री बोगस आहे का, हे एकदा बघून घ्या.”, असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे.

तसेच बाळासाहेबांनी भोंग्याबाबतीत भूमिका मांडली होती. पण त्यांनी रस्त्यावरचे नमाज तोडगा देऊन बंद केले. हा इतिहास कुणाला माहिती नसेल, तर त्यांनी पुन्हा बाळासाहेब समजून घ्यावे. यासंदर्भातल्या बाळासाहेब यांच्या भाषणाच्या कॅसेट आम्ही त्यांच्याकडे पाठवून देऊ. असा टोलाही संजय राऊत यांनी लगावला आहे.

महत्वाच्या बातम्या: 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!