Share

‘सरनाईक कोरोनाला घाबरतायत की ईडीला?’

Published On: 

मुंबई : मनी लाँड्रिंग प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) काल शिवसेना नेते आणि आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरावर आणि कार्यालयांवर छापेमारी केल्यानंतर त्यांचे पुत्र विहंग सरनाईक यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. चौकशीसाठी ईडीच्या कार्यालयात नेण्यात आलं होतं. यानंतर, त्यांना आज दुपारी १२ वाजता पुन्हा एकदा चौकशीसाठी बोलावण्यात आल्याचं सांगण्यात येत होतं.

आमदार प्रताप सरनाईक यांना ईडी कार्यालयाने समन्स बजावले आहे. त्यांना चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, आपण परदेशातून आल्याने आठ दिवस आपल्याला सक्तीने क्वॉरंटाईन राहावं लागत आहे. शिवाय विहंगची पत्नीही आजारी आहे. त्यामुळे दोघांनाही चौकशीला उपस्थित राहता येणार नाही, असं सरनाईक यांनी ईडीला कळवलं असल्याचं सूत्रांनी सांगितलं. तसेच, पुढील आठवड्यात चौकशी करण्यात यावी अशी विनंती देखील त्यांनी ईडीला केली आहे.

यानंतर, भाजप नेते किरीट सोमय्या यांनी प्रताप सरनाईक यांच्यावर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. ‘सरनाईक चौकशीला जात नाहीयेत हे समजले. कारण त्यांना अचानक ब्रह्मज्ञान झालं की ते बाहेरून आले होते त्यामुळे क्वारंटाईन व्हायला हवं. काल दिवसभरात ते संजय राऊत, सुनील राऊत यांना भेटले मग उद्धव ठाकरे त्यांना क्वारंटाईन करणार का?’ असा सवाल करत त्यांनी ‘सरनाईक तुम्ही कोव्हीडला घाबरताय की ईडीला?’ अशी खोचक टीका किरीट सोमय्या यांनी केली आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!