Share

संजय राऊत पुन्हा एकदा घेणार उद्धव ठाकरेंची मुलाखत; विषयावरून वाढली उत्सुकता

Published On: 

मुंबई : शिवसेनेचे नेते व खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची जुलैमध्ये घेतलेली ‘अनलॉक मुलाखत’ प्रचंड गाजली होती. यानंतर या मुलाखतीवर भाजप नेत्यांनी जोरदार टीकास्त्र सुद्धा सोडलं होतं. तर, मधल्या काळात संजय राऊत यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची अचानक भेट घेतल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या होत्या.

राजकीय उलथापालथ होणार अशा चर्चांना उधाण आलं होतं. मात्र ही भेट फडणवीस-राऊत यांच्यामधील मुलाखतीच्या चर्चेसाठी झाल्याचं राऊतांनी सांगितलं. तर, देवेंद्र फडणवीसांनी देखील या मुलाखतीआधी काही अटी घातल्या. या मुलाखतीसंदर्भात अद्याप ही प्रतीक्षा असतानाच आता संजय राऊत यांनी एका नव्या मुलाखतीची घोषणा केली आहे.

राज्यात मागील वर्षी ऐनवेळी राजकीय गणित बदलल्यामुळे झालेलं सत्तांतर पाहायला मिळालं. भाजप-शिवसेनेच्या महायुतीला २०१९ निवडणुकांमध्ये बहुमत मिळालं. मात्र, काही मतभेदांमुळे शिवसेनेनं भाजपची साथ सोडली आणि विरोधी विचारधारा असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेससोबत जाऊन महाविकास आघाडी सरकारची स्थापना केली.

आता, या सरकारला वर्षपूर्ती होत आली आहे. महाविकास आघाडी सरकार स्थिर असून पुढील काही निवडणुका देखील भाजपला विरोधी पक्षातच बसावं लागणार असा टोला महाविकास आघाडीतील नेत्यांनी लगावला आहे. याच वर्षपूर्तीच्या पार्श्वभूमीवर संजय राऊत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेणार आहेत. त्यामुळे, आता उद्धव ठाकरे संजय राऊतांच्या प्रश्नांवर काय खुलासा करणार याबाबत कुतूहल निर्माण होत आहे.

https://www.facebook.com/sanjayraut.official/posts/670015747028944

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!