🕒 1 min read
मुंबई : शिवसेना पक्ष आणि राणे परिवार यांच्यातील वाद पूर्ण महाराष्ट्राला परिचतच आहे. नारायण राणे यांनी शिवसेना पक्ष सोडल्यावर हा वाद रोजच होत आहे. मध्यंतरी किरीट सोमय्या यांनी शिवसेनेच्या नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप केल्यावर , शिवसेनेच्या नेत्यांनी सुद्धा भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांच्या आरोपाला प्रत्युत्तर दिले आहे.
मंगळवार दिनांक १५ फेब्रुवारी २०२२ रोजी मुंबईमधील शिवसेना भवन येथे शिवसेनेचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपचे नेते किरीट सोमय्या आणि विद्यमान केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर भ्रष्टाचाराचे आणि गुंडागर्दीचे आरोप केले होते. काल भारतीय जनता पक्षाचे आमदार नितेश राणे यांनी पुन्हा उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करत आम्हाला खुल्या मैदानात भेटावे असे आवाहन केले होते. तर आज केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन पुन्हा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेना पक्षावर टीका केली आहे. महाराष्ट्राचे विद्यमान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे राज्याच्या इतिहासातील सर्वात निष्क्रिय मुख्यमंत्री आहेत. ते काहीच काम करत नाही. ते नुसते मातोश्री या स्वतःच्या घरी बसून असतात. उद्धव ठाकरे हे महाराष्ट्र राज्याच्या कॅबिनेट बैठकीला पण कधीच जात नाही, एवढेच नव्हे तर उद्धव ठाकरे कधीही मंत्रालयात सुद्धा गेले नाहीयेत.
त्यांना राज्याच्या कारभाराचे काहीच पडले नसून त्यांच्या जागी इतर कोणी मुख्यमंत्री असत तर त्यांनी मला काम जमत नाहीये असं म्हणून मुख्यमंत्री पदाचा कधीच राजीनामा दिला असता.
महत्वाच्या बातम्या :
- मैदानात हरायच आणि शेमड्या मुलासारखं… ; नितेश राणेंचा शिवसेनेवर हल्लाबोल
- ऋषभ पंत मॅन ऑफ द मॅच घोषित झाल्यावर रोहितने केले ‘हे’ कृत्य
- बाळासाहेबांचा प्रिय शिवसैनिक त्यांच्या चरणी रुजू होण्यासाठी स्वर्गस्थ झाला- संजय राऊत
- छत्रपती शिवाजी महाराजांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत- पंतप्रधान मोदी
- “भूमिपुत्रांच्या मनात स्वातंत्र्याची ज्योत प्रज्वलीत करून आपल्या न्यायासाठी लढण्याची शिकवण महाराजांनी दिली”
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
