मुंबई: भारताचा कर्णधार रोहित शर्मा, जो वेस्ट इंडीज विरुद्ध २ऱ्या टी२० सामान्यामध्ये टीम इंडियाच्या खराब फिल्डिंगमुळे थोडा नाराज दिसत होता, मात्र सामन्याच्या शेवटी खेळानंतर मजा करताना दिसला. तीन सामन्यांच्या मालिकेतील दुसऱ्या T20 सामन्यात कॅरेबियन संघाला पराभूत केल्यानंतर मेन इन ब्लूने आणखी एक मालिका जिंकल्यामुळे संघ मजेच्या मूडमध्ये दिसला.
सामन्यात ५२ धावांची अर्धशतकी खेळी केलेल्या ऋषभ पंतला मॅन ऑफ द मॅच घोषित करण्यात आले होते. मात्र त्यानंतर कर्णधार रोहित जोराने हसताना दिसला आहे. सामन्यानंतरच्या पोस्ट मॅच प्रेसेंटेशन वेळी हर्षा भोगलेने ऋषभला सामनावीर पुरस्कार घेण्यासाठी आमंत्रित केले, तेव्हा रोहितने हर्षाची खिल्ली उडवली आणि उपहासात्मकपणे विचारले, “ऋषभ पंत मॅन ऑफ द मॅच आहे का?”
https://twitter.com/addicric/status/1494736105685630984?s=20&t=GCayoi6XqWDS_C7UBun5Fw
भारतीय क्रिकेट टीमने टी २० वर्ल्डकपमधील खराब कामगिरीपासून आता घरच्या मैदानावर मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करत आहे. त्यांनी टी २० मालिकेत न्यूझीलँडचा ३-०ने पराभव केला होता. नुकतेच त्यांनी एकदिवसीय मालिकेतही विंडीजचा व्हाईटवॉश केला. रोहित शर्माच्या कर्णधारपदाची सुरुवात दमदार झाली आहे. भारतीय संघाने वेस्ट इंडिज विरुद्धही मालिका २-० ने जिंकली आहे.
महत्वाच्या बातम्या
- मैदानावर पोस्टर नेत विराटचा पाकिस्तानी चाहता म्हणाला “ विराटने पाकिस्तानात…”
- “दोन किमीचा रस्ता करता करता…”, नितीन गडकरींनी सांगितला ‘तो’ किस्सा
- Shiv Jayanti 2022 : ना स्वागत, ना भाषण…फक्त शिवजागर
- IND vs WI: वेस्ट इंडिज विरुध्द दुसरा टी २० सामना जिंकत भारतीय संघाने रचले किर्तीमान
- पंजाबचे मुख्यमंत्री चन्नी यांच्या विरोधात बिहारमध्ये गुन्हा दाखल


