मुंबई : शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सुधीर जोशी यांचे १७ फेब्रुवारी रोजी निधन झाले. त्यांनी वयाच्या ९३ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. दरम्यान, शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आजच्या आपल्या सामना अग्रलेखाच्या माध्यमातून सुधीर जोशी (Sudhir Joshi) यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
लेखात राऊत म्हणाले आहेत की,‘दादरच्या बालेकिल्ल्यातील शिवसैनिक असल्याचा अभिमान ते बाळगीत. दादरच्या शाखा क्रमांक ६१ मध्ये ते संध्याकाळी लोकांची गाऱ्हाणी ऐकायला बसत. अनेक सामाजिक संस्थांची जोपासना त्यांनी केली. त्यांचा मूळ व्यवसाय खाणावळीचा, पण शिवसेना व लोकाधिकारच्या माध्यमातून हजारो तरुणांना भाऊंनी पोटापाण्यास लावले व शिवसेनेचा पाया भक्कम केला. शिवसेनाप्रमुखांवर त्यांची श्रद्धा होती. बाळासाहेब ठाकरे यांचा प्रिय शिवसैनिक त्यांच्या चरणी रुजू होण्यासाठी स्वर्गस्थ झाला आहे.’
दरम्यान, पुढे ते म्हणाले की, ‘सुधीर जोशी यांचे जाणे चटका लावणारे आहे. आज राजकारणात ‘दादा’, ‘भाई’ वगैरेंचा जमाना आहे, पण फक्त शिवसेनेत नाही तर राज्यभरातील वर्तुळात ते ‘भाऊ’ म्हणूनच परिचित होते. राजकारण व समाजकारणातला हा ‘भाऊ’ वयाच्या ८१ व्या वर्षी आपल्याला सोडून गेला आहे. सुधीर जोशींचे व्यक्तिमत्त्व तजेलदार व रुबाबदार होते. शिवसेनेच्या स्थापनेपासून ते चळवळीत होते. बँकांच्या परीक्षेत मराठी तरुण मागे पडू नयेत म्हणून प्रशिक्षण वर्गाची योजना केली. लोकाधिकार चळवळीतून लाखो मराठी तरुण सरकारी आस्थापनांत नोकरीस लागले व पुढे हाच पांढरपेशा सुशिक्षित तरुण शिवसेनेचा पाठीराखा बनला.’
महत्वाच्या बातम्या :
- Shiv Jayanti 2022 : ना स्वागत, ना भाषण…फक्त शिवजागर
- IND vs WI: वेस्ट इंडिज विरुध्द दुसरा टी २० सामना जिंकत भारतीय संघाने रचले किर्तीमान
- “दोन किमीचा रस्ता करता करता…”, नितीन गडकरींनी सांगितला ‘तो’ किस्सा
- मैदानावर पोस्टर नेत विराटचा पाकिस्तानी चाहता म्हणाला “ विराटने पाकिस्तानात…”
- “….पुरावे असतात तेव्हा वाझे आणि अनिल देशमुख होतो”, भातखळकरांचा संजय राऊतांना टोला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

