Share

“भूमिपुत्रांच्या मनात स्वातंत्र्याची ज्योत प्रज्वलीत करून आपल्या न्यायासाठी लढण्याची शिकवण महाराजांनी दिली”

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांच्या (Chhatrapati Shivaji Maharaj) जयंतीनिमित्त शिवजन्मोत्सवाचा उत्साह सर्वत्र बघायला मिळत आहे. सर्वत्र शिवरायांना वंदन केले जात आहे. याच पार्श्वभूमीवर खासदार संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chhatrapati) यांनी देखील छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन केले आहे. तसेच भूमिपुत्रांच्या मनात स्वातंत्र्याची ज्योत प्रज्वलीत करून आपल्या न्यायासाठी लढण्याची शिकवण महाराजांनी दिली, असेही संभाजीराजे म्हणाले आहेत.

यासंदर्भात संभाजीराजे छत्रपती यांनी ट्विट केले असून ट्विटमध्ये ते म्हणाले आहेत की,‘शिवजयंतीच्या मंगलदिनी शिवजन्मस्थळ किल्ले शिवनेरी येथे छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून आशीर्वाद घेतले. भूमिपुत्रांच्या मनात स्वातंत्र्याची ज्योत प्रज्वलीत करून आपल्या न्यायासाठी लढण्याची शिकवण महाराजांनी दिली’, असे ते म्हणाले आहेत.

दरम्यान, पुढे ते म्हणाले की,‘हीच शिकवण, हे संस्कार मनाशी बाळगून महाराजांच्या विचारांवर चालत जनहितासाठी कार्यरत राहण्यासाठी मी बांधील आहे आणि यासाठी मला बळ द्यावे, हाच आशीर्वाद मागितला.’, असेही संभाजीराजेंनी सांगितले.

महत्वाच्या बातम्या :         

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!