नागपूर : महानगरपालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे आणि सत्ताधारी भाजपाच्या नेत्यांमध्ये रंगलेला कलगीतुरा काही दिवसांपासून तमाम महाराष्ट्रातील लोक अनुभवत आहेत. कधी हा वाद इतका टोकाला जातो की, शहराभोवती घोंघावत असलेल्या कोरोनाच्या संकटाचे देखील भान सत्ताधाऱ्यांना राहात नाही. यात विजय कोणाचा हा प्रश्न अद्यापही कायम आहे. आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तुकाराम मुंढे यांच्याच बाजूने कौल दिला असल्याने नागपूर महापालिकेतील वादाला नवे वळण येण्याची शक्यता आहे.
तुकाराम मुंढे नागपूर महानगर पालिकेच्या आयुक्तपदी आलेत अन् त्याच्यात व महापौर संदीप जोशी त्यांच्यात शीतयुद्धाला प्रारंभ झाला. मधल्या काळात तर या वादात थेट केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी देखील उडी घेतली. त्यामुळे तुकाराम तुंढे विरुद्ध भाजपाचे संदीप जोशी असा उघड सामना रंगू लागला. आता जो सामना केंद्रापर्यंत पोहचला तो राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या दारात पोहचला नसेल तर नवलच……
नुकतिच शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ‘दै. सामना’साठी मुलाखत घेतली. या मुलाखतीमध्ये नागपूर महानगरपालिमध्ये सुरु असलेल्या वादाबाबतही राऊत यांनी प्रश्न विचारला. ‘नागपुरात तुकाराम मुंढे महापालिकेचे आयुक्त आहेत. त्यांच्यात आणि नगरसेवकांमध्ये वाद सुरू आहेत. इतकेच काय, केंद्रीय मंत्री नितीन गडकरींशी मुंडेंनी पंगा घेतला आहे.’ असा संदर्भ राऊतांनी जोडला. यावर मुख्यमंत्री म्हणाले, ‘बरोबर आहे. तुम्ही ( सत्ताधारी भाजप ) सचिवांची यंत्रणा केराच्या टोपलीत फेकून द्या . मंत्रालय की, सचिवालय हा वाद हवा कशाला ? सचिव पद्धतच बंद करुन टाका. पिन टू पियानो म्हणजे ए टू झेड… आदेश पण तुम्हीच काढायचे, कामे पण तुम्हीच करा अन् मदतीचे वाटप वगैरे तुम्हीच करायचे.
त्यानंतर राऊतांनी विचारले, ‘ राज्याचे मुख्यमंत्री म्हणून तुम्ही तुकाराम मुंढेंच्या मागे आहात की, त्या लोकनियुक्त महापालिकेच्या जी मुंढे यांच्या मागे लागलीय हात धुऊन ?’ प्रारंभी याचे उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी राऊतांना प्रतिप्रश्न केला. ‘तुमचे मत काय ? कोणाचे बरोबर आहे ?’ यावर राऊत म्हणाले, ‘अर्थात शिस्तीच्या मागे उभे राहायला हवे . यावर ठाकरे म्हणाले, ‘मग तसंच आहे. एखादा अधिकारी कठोर असू शकतो, कडक असू शकतो. असेल … पण त्याच्या कठोरपणाचा तुम्ही लोकांच्या हितासाठी उपयोग करून घेत असाल तर वाईट काय ? त्यावेळी त्यांनी काही नियम, काही कायदे कडकपणे अमलात आणले, हे काही जणांना परवडत नसेल. पण तुकाराम मुंढेंनी एखादी गोष्ट कडकपणे अमलात आणली तर अशा अधिकाऱ्यांच्या पाठीशी सर्वांनी उभे राहायला पाहिजे. आततायीपणा कोणीच करू नये, शिस्त लावली जात असेल आणि जनतेचे हित जोप सले जात असेल, तर चांगले आहे. शेवटी जनतासुद्धा उघड्या डोळ्यांनी हे बघत असते. त्यांच्या तोंडावर मास्क असला तरी जनतेचे डोळे उघडे आहे, हे विसरुन चालणार नाही. पुढे उद्धव ठाकरे म्हणाले, मी मागेसुद्धा म्हटले होते, हा महाराष्ट्र आहे त्याचा धृतराष्ट्र अजून झालेला नाही आणि होऊ शकत नाही.
‘सामना’च्या या मुलाखतीतून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तुकाराम मुंढेंच्या पाठीशी आहे , हे स्पष्ट झाले . याशिवाय पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनीही नागपुरातील नद्यांचे व्यवस्थापन उत्कृष्टपणे केल्याबद्दल मुंढेंचे ट्विटरवर कौतुक केले आहे . मुंढे आणि पालिकेतील सत्ताधाऱ्यांमधील आतापर्यंतचा संघर्ष बघितला तर मुख्यमंत्र्यांसह शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्रीही तुकाराम मुंढे यांच्या सोबत असल्याचे स्पष्ट होते. त्यामुळे मुंढेंना नमविण्यासाठी पालिकेतील सत्ताधान्यांना अधिक जोमाने कामाला लागावे लागेल यात शंका नाही. राज्य सरकारचा भक्कम पाठिंबा आणि मुंढेंचा निश्चयी स्वभाव, नागपुरातील परिवर्तनासाठी महत्त्वाचा ठरेल पण हा संघर्ष ईतक्यात थांबणारा नाही, सत्यच आहे.
महत्वाच्या बातम्या-
महाराष्ट्र पुन्हा हादरला : राज्यात एका दिवसातील सर्वात जास्त रुग्ण वाढ
शरद पवारांसोबतच्या भेटी हा एक वेगळा अनुभव असतो – उद्धव ठाकरे
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

