Share

महाराष्ट्र पुन्हा हादरला : राज्यात एका दिवसातील सर्वात जास्त रुग्ण वाढ

Published On: 

मुंबई : राज्यात आज ५५५२ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५५.६२ टक्के असून आतापर्यंत एकूण संख्या १ लाख ८७ हजार ७६९ झाली आहे. दरम्यान, आज कोरोनाच्या १० हजार ५७६ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात १ लाख ३६ हजार ६०७ रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या १६ लाख ८७ हजार २१३ नमुन्यांपैकी ३ लाख ३७ हजार ६०७ नमुने पॉझिटिव्ह (२० टक्के) आले आहेत. राज्यात ८ लाख ५८ हजार १२१ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ४४ हजार ९७५ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज २८० करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर ३.७२ टक्के एवढा आहे.

…तर मोदींना सुद्धा ५ ऑगस्टचा राम मंदिराचा कार्यक्रम प्रतिकात्मक करायला सांगा – इम्तियाज जलील

राज्यात नोंद झालेले २८० मृत्यू हे मुंबई मनपा-५८, ठाणे-१६, ठाणे मनपा-१३, नवी मुंबई मनपा-३,कल्याण-डोंबिवली मनपा-६, उल्हासनगर मनपा-२, भिवंडी निजामपूर मनपा-३, मीरा-भाईंदर-७, वसई-विरार मनपा-४,पालघर-१,रायगड-१,पनवेल-३, नाशिक-२, नाशिक मनपा-४, अहमदनगर-३, अहमदनगर मनपा-३, धुळे-१, जळगाव-८, जळगाव मनपा-१, नंदूरबार-१, पुणे-३, पुणे मनपा-३६, पिंपरी-चिंचवड मनपा-१८,सोलापूर-६, सोलापूर मनपा-६, सातारा-२, कोल्हापूर-६, कोल्हापूर मनपा-१०, सांगली-१, सांगली मिरज कुपवाड मनपा-३, रत्नागिरी-३, औरंगाबाद-४, औरंगाबाद मनपा-२३, जालना-१, हिंगोली-१, परभणी-२, लातूर-२, लातूर मनपा-१, उस्मानाबाद-१, नांदेड मनपा-३, अकोला-१, अकोला मनपा-२, बुलढाणा-१, नागपूर मनपा-३, या जिल्हा आणि मनपा क्षेत्रातील तर इतर राज्य १ अशी नोंद आहे.

संतापजनक! तपासणीसाठी आलेल्या पथकलाच ग्रामस्थांनी हाकलले; अधिकाऱ्यांना शिवीगाळ देखील केल्याचे वृत्त

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!