Share

शरद पवारांसोबतच्या भेटी हा एक वेगळा अनुभव असतो – उद्धव ठाकरे

Published On: 

मुंबई : शिवसेना खासदार आणि ‘सामना’चे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतली आहे. ‘अनलॉक मुलाखत’ या मथळ्याखाली ही संपूर्ण मुलाखत दोन भागांमध्ये प्रदर्शित केली गेली. या मुलाखतीचा दुसरा भाग आज प्रदर्शित झाला. उद्धव ठाकरे यांनी करोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक महत्वाच्या प्रश्नांची उत्तरे या मुलाखतीमध्ये दिली आहेत. अगदी लॉकडाउनच्या कालावधीपासून ते त्यांच्यावर होणाऱ्या टीकेसंदर्भातही मुख्यंत्र्यांनी आपली रोकठोक मते मांडली आहेत. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खासदार शरद पवारांचं किती मार्गदर्शन लाभतं याचा देखील उलगडा उद्धव ठाकरे यांनी या मुलाखतीत केला आहे.

‘शरद पवार यांच्यासोबतच्या भेटी हा एक वेगळा अनुभव असतो. ते भेटतात तेव्हा काही कामं घेऊन येतात असं अजिबात नाही. कधी कधी त्यांचा फोन येतो की, उद्या काय करताय? आणि बहुतेक वेळा मग सगळं जुळत असेल तर त्यांची आणि माझी भेट होते. भेटीत ते त्यांचे जुने अनुभव सांगत असतात’. अस उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. तर, लातूरला भूकंप झाला तेव्हा त्यांनी काय केलं होतं चीनचा विषय निघाला. संरक्षणमंत्री असतानाचे त्यांचे अनुभव त्यांचा चीन दौरा मग चीनच्या पंतप्रधानांसोबत काय चर्चा झाली जुन्या त्यांच्या अनुभवांच्या आठवणी ते सांगत असतात’. अस देखील उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

दरम्यान, गपूर महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे आणि महापौर संदीप जोशी यांच्यातील संघर्षाची राज्यभरात चर्चा झाली. या संघर्षातून प्रशासन आणि लोकप्रतिनिधी दोघी समोरासमोर आल्याचं चित्र दिसलं. दरम्यान, याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना प्रश्न विचारला असता, त्यांनी तुकाराम मुंढे यांचं समर्थन केलं आहे तुकाराम मुंढे आणि नगरसेवकांमध्ये वाद सुरु आहेत. इतकेच काय, केंद्रीय मंत्री नितीन गडकरींशीही त्यांनी पंगा घेतलाय. तुम्ही तुकाराम मुंढेंच्या मागे आहात की लोकनियुक्त महापालिकेच्या? असा प्रश्न संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांना विचारला. या प्रश्नाचं उत्तर देताना तुकाराम मुंढे शिस्तप्रिय असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

मुंबईत सातत्याने कमी चाचण्यांमुळे होणारी मृत्यूसंख्येत वाढ चिंताजनक;देवेंद्र फडणवीस यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

‘तुकाराम मुंढे नागपूर महापालिकेत आल्यापासून तिथे शिस्त लागली आहे. त्यामुळे शिस्तीच्या मागे उभं राहणार’, अशी भूमिका मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली ‘एखादा अधिकारी कठोर किंवा कडक असेल, पण त्याच्या कठोरपणाचा तुम्ही लोकांच्या हितासाठी उपयोग करुन घेत असाल तर वाईट काय? त्या वेळी त्यांनी काही नियम, काही कायदे कडकपणाने अमलात आणवले हे काही जणांना परवडत नसेल. पण तुकाराम मुंढेंनी एखादी गोष्ट कडकपणाने अमलात आणली तर अशा अधिकाऱ्याच्यापाठी सर्वांनी उभं राहायला पाहिजे’, असं उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं.

‘आततायीपणा कोणीच करु नये, शिस्त लावली जात असेल आणि जनतेचं हीत जोपासलं जात असेल तर चांगलं आहे. शेवटी जनतासुद्धा उघड्या डोळ्यांनी हे बघत असेल. त्यांच्या तोंडावर मास्क असला तरी जनतेचे डोळे उघडे आहेत हे विसरुन चालणार नाही. म्हणून मी मागेसुद्धा म्हटले होते की, हा महाराष्ट्र आहे, त्याचा धृतराष्ट्र अजून झालेला नाही आणि होऊ शकत नाही’, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

ई-सीमचा वापर करताय ? सावधान…महाराष्ट्र सायबर विभागाचे आवाहन एकदा वाचाच

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!