मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या काल मुंबईत झालेल्या सभेमुळे राज्यातलं राजकीय पुन्हा एकदा वातावरण चांगलंच तापलं आहे. कालच्या सभेत उद्धव ठाकरे यांनी अनेकांवर निशाणा साधला. देवेंद्र फडणवीस, भाजपा आणि राज ठाकरे यांच्यावर जोरदार हल्ला केला. आता याच टीकेला प्रत्युत्तर देण्यासाठी देवेंद्र फडणवीस आज सभा सुरु आहे. फडणवीसांची ही उत्तरसभा आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी कालच्या उद्धव ठाकरे यांच्या काल मुंबईत झालेल्या सभेवर खोचक टीका केली आहे. उद्धव ठाकरे यांच्या मास्टर सभा नाही तर ती लाफ्टर सभा होती, असा खोचक वार देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.
काल उद्धव ठाकरे यांच्या झालेल्या सभेनंतर आता भाजपाकडून मुंबईतल्या गोरेगाव भागात आज सभा आयोजित केली आहे. विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली ही सभा पार पडणार आहे. मात्र ही सभा आज ठरवली गेली नसून, ती पूर्वनियोजित होती. मुख्यमंत्र्यांच्या आरोपांना उत्तर देण्यासाठी ही सभा आयोजित केली नसल्याची माहिती भाजपाकडून सांगण्यात आले होते.
महत्त्वाच्या बातम्या :


