मुंबई : आयपीएल २०२२ (IPL 2022)मधील ६२ वा सामाना रविवारी चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स या दोन संघात खेळला जात आहे. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर सुरू असलेल्या सामन्यात चेन्नईचा कर्णधार एमएस धोनीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. चेन्नई संघाची फलंदाजी संपूर्ण डावात एकदम संथ गतीची राहिली. चेन्नईने गुजरातला १३३ धावांचे लक्ष दिले आहे.
चेन्नईकडून सामन्याची सुरुवात करताना डेवेन कॉनवे (५) लवकरच बाद झाला. त्यानंतर फलंदाजीसाठी खेळपट्टीवर आलेल्या मोईन अलीने ऋतुराज गायकवाड सोबत भागीदारी रचली. त्यानंतर मोईन अली २१ धावांवर बाद झाला. चौथ्या क्रमांकावर फलंदाजीस आलेल्या एन जगदीशनने (३९) ऋतुराज सोबत धावांची महत्त्वपूर्ण खेळी खेळली. शिवम दुबेला खातेही उघडता आले नाही तो शून्यावर बाद झाला. धोनीलाही काही खास कामगिरी करता आली नाही तो (७) धावा करून माघारी परतला. ऋतुराज गायकवाड ने चेन्नई कडून सर्वाधिक ५३ धावांची महत्त्वपूर्ण खेळी खेळली. गुजारतकडून गोलंदाजी करताना मोहम्मद शमीने सर्वाधिक २ गडी बाद केले तर राशिद खान, अल्जारी जोसेफ आणि साई किशोरने प्रत्येकी १ गडी बाद केला.
Innings Break! @gujarat_titans put on a solid show with the ball to restrict #CSK to 133/5. ???? ????
Will @ChennaiIPL manage to defend the total? ???? ????
Scorecard ▶️ https://t.co/wRjV4rFs6i #TATAIPL | #CSKvGT pic.twitter.com/5EIO3XOYOH
— IndianPremierLeague (@IPL) May 15, 2022
दोन्ही संघांची Playing 11
चेन्नई सुपर किंग्स – एम.एस धोनी (कर्णधार), मोईन अली, रुतुराज गायकवाड़, मिशेल सेंटनर, डेवोन कॉनवे, शिवम दुबे, सिमरजीत सिंह, एन जगदीशन, एम पथीरणा प्रशांत सोलंकी आणि मुकेश चौधरी
गुजरात टाइटन्स – हार्दिक पांड्या (कर्णधार), डेविड मिलर, शुबमन गिल, राहुल तेवतिया, मैथ्यू वेड, रिद्धिमान साहा, अल्जारी जोसेफ, मोहम्मद शमी, राशिद खान, रविश्रीनिवासन साई किशोर, आणि यश दयाल
महत्वाचा बातम्या:
IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

