Share

अण्णा हजारे पुन्हा राज्यसरकार विरोधात आंदोलन छेडणार; उद्धव ठाकरेंना दिला इशारा!

Published On: 

अहमदनगर : ज्येष्ठ सामाजसेवक अण्णा हजारे आता पुन्हा एकदा राज्य सरकार विरोधात आंदोलन करण्याच्या तयारीत आहेत. अण्णा हजारे यांनी असा इशाराच महाविकास आघाडी सरकारला दिला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे लोकायुक्त कायदा करायला दिरंगाई करत आहेत, असा आरोप आण्णा हजारे यांनी केला आहे. लोकायुक्तांचा कायदा करा अन्यथा मुख्यमंत्री पदावरून पायउतार व्हा, असा इशाराही त्यांनी मुख्यमंत्र्यांना दिला आहे.

आण्णा हजारे म्हणाले, आता राज्यामध्ये पुन्हा एकदा आंदोलन करण्याची आवश्यकता आहे. जिल्हा स्तरावरील बैठका सुरु झाल्या आहेत आणि प्रत्येक जिल्ह्यातील तालुक्यात आज जवळपास दोनशे कमिट्या स्थापन झाल्या आहेत. लवकरच या कमिट्यांच्या बैठका झाल्या आणि आंदोलनाची बांधणी झाली की महाराष्ट्रातील ३५ जिल्हे आणि एकाच वेळेला ३०० तालुक्यांमध्ये आम्ही लोकायुक्त कायद्यासाठी आंदोलन छेडणार आहोत. लोकायुक्त कायदा करा नाहीतर पायउतार व्हा, असा इशाराही आण्णा हजारे यांनी मुख्यमंत्र्यांना दिले आहे.

दरम्यान राज्यात सरकार स्थापन होऊन दोन वर्षे झाली तरी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लोकायुक्त कायद्या करायाल तयार नाहीत, या कायद्यावर बोलायला तयार नाहीत, असा आरोपही अण्णा हजारे यांनी केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या : 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!