महाड : गुरुवारी दुपारी 4 वाजताच्या सुमारास महाडच्या तळीये गावात दरड कोसळण्याची दुर्घटना घडली. महाड तालुक्यातील तळीये गाव हे डोंगर कपारीमध्ये वसलेले आहे. या गावावर दरड कोसळल्याने दरडीखाली 35 घरे दबली गेली. दरड कोसळण्याची घटना घडताच स्थानिकांनी धाव घेऊन मदत कार्यास सुरुवात केली. स्थानिकांनी मातीच्या ढिगाऱ्याखालून सुरुवातीला 32 जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले होते.
याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज महाडच्या तळीये गावात जाऊन दुर्घटनाग्रस्त परिसराची पाहणी केली. त्यावेळी, घडलेल्या दुर्घटना पाहता सरकारकडून पुनर्वसन आराखडा आणि जल मॅनेजमेंट करण्यात येईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. निसर्ग कोपात आक्रीत घडलं, हे पाहिल्यानंतर, डोंगरदऱ्यातील लोकांचे पुनर्वसन करण्यासाठी सरकार आराखडा तयार करेल. वेधशाळा अंदाज व्यक्त करते, पण त्याचं प्रमाण आणि परिणाम कुणालाही सांगता येत नाही.
कालपासून सातारा, सांगली, कोल्हापूर भागात खूप तणाव होता. नद्यांचं पाणी शहरात शिरलं आहे, ते पाहता नद्यांच्या वाहत्या पाण्यासाठी वॉटर मॅनेजमेंटचाही आराखडा करण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. पुढे बोलताना ते म्हणाले की, ज्यांच नुकसान झालं आहे, त्यांना सरकार सर्वोतोपरी मदत करेल. जल व्यवस्थापन करण्याचा प्रयत्न आहे. केंद्रीय यंत्रणांकडून व्यवस्थित सहकार्य मिळत आहे, सर्वच ठिकाणी आपली पथकं पोहोचत आहेत.
अनेक ठिकाणच्या नागरिकांचं स्थलांतर केलं आहे, अद्यापही जिथं गरज आहे, तेथील नागरिकांचं स्थलांतर करण्यात येत आहे. आपत्ती व्यवस्थापन करणारीही माणसंच आहेत, त्यांनाही घटनास्थळी पोहोचायला वेळ लागत आहे. पावसाची, वाहत्या पाण्याची अडचण आहे. मात्र, या टीम त्यांचं काम जोमानं करत आहेत, असेही उद्धव ठाकरेंनी सांगितले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ऑनलाईन व्यवहार करताना ‘या’ गोष्टीपासून सावध राहण्याचा जिओने दिला सल्ला
- केरोसीन आणि अन्नधान्य पूरग्रस्त भागात पोहोचवणार; छगन भुजबळ यांची माहिती
- ‘संकटाच्या काळात जनतेला पाठ दाखवणारे अनिल परब हे पळकुटे मंत्री’
- दोन मुलांचे धोरण देशभरात राबवणार का?, केंद्राने संसदेत दिले ‘हे’ उत्तर
- ‘डोक्यावर मृत्यू दिसत असूनही नागरिकांना मरणासाठी का सोडले?, भाजपाचा संतप्त सवाल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
