Share

उद्धव ठाकरेंमध्ये राष्ट्राचं नेतृत्व करण्याची क्षमता; संजय राऊतांचे गौरवोद्गार

Published On: 

मुंबई : शिवसेनेनं भाजपची साथ सोडून विसंगत विचारधारा असलेल्या काँग्रेसची आणि राष्ट्रवादी काँग्रेसची साथ घेत महाविकास आघाडी सरकारची स्थापना केली. यानंतर अनपेक्षितपणे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री झाले . विरोधकांचा हल्लाबोल, आघाडी सरकारमधील अंतर्गत कलह, कोरोना महामारी, नैसर्गिक संकट, मंत्र्यांवरील आरोप अशा अडथळ्यांना मात देऊन उद्धव ठाकरे हे आता मुख्यमंत्रीपदाचे २ वर्षे पूर्ण करणार आहेत. हे सरकार ५ वर्षे टिकेल असा विश्वास महाविकास आघाडीतील नेते व्यक्त करत असून भाजप नेते मात्र हे सरकार कोसळेल असं भाकीत करत आहेत.

उद्धव ठाकरे यांच्या सरकारवर भाजप नेते सातत्याने हल्लाबोल करत असून शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी मात्र पुन्हा एकदा कौतुकाची थाप दिली आहे. संजय राऊत यांना माध्यमांच्या प्रतिनिधींनी, ‘नजीकच्या काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राष्ट्रीय स्तरावर काम करू शकतात का?’ असा सवाल केला.

यावर उत्तर देताना राऊत म्हणाले, ‘उद्धव ठाकरे यांच्यामध्ये राष्ट्राचं नेतृत्व करण्याची क्षमता आहे आणि महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हा आपोआप देशाचा नेता होत असतो.’ दरम्यान, शिवसेनेनं गोवा आणि उत्तर प्रदेश राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकांसाठी तयारी सुरु केल्याचं राऊत यांनी जाहीर केलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!