नवी दिल्ली : 10 सप्टेंबरपासून पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील शेवटचा सामना मँचेस्टर येथे सुरू होणार होता. मात्र, अंतिम कसोटी सामन्यापूर्वी टीम इंडियाच्या मॅनेजमेंटमधील एका सदस्याला कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आले. तत्पूर्वी, प्रमुखांसह चार सपोर्ट स्टाफ सदस्य कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. याच पार्श्ववभूमीवर हा सामना स्थगित करण्यात आला आहे. दोन्ही संघाची संमती घेऊन हा सामना रद्द केला असल्याची माहिती मिळाली.
मालिकेतील शेवटचा सामना रद्द झाल्यांनतर सर्वत्र गोंधळाची परिस्थिती निर्माण झाल्याची दिसत आहे. भारताचे असिस्टंट फिजिओ योगेश परमार यांना कोरोना झाल्याची माहिती समोर आली होती. त्यामुळे भारतीय संघात भीतीचं वातावरण होतं. मात्र, हा सामना कोरोनामुळे नव्हे तर पुढची परिस्तिथी पाहता रद्द केला आहे. हा सामना आयपीएमुळे रद्द केल्याचा गंभीर आरोप इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉन याने केला आहे.
या सर्व प्रकारावर मायकल वॉन याने ‘द टेलिग्राफ’मध्ये लिहिलेल्या लेखात म्हटले की, ‘प्रामाणिकपणे सांगायचे झाले तर हे सर्व आयपीएल आणि पैशांसाठी करण्यात आले. खेळाडूंना कोरोना संक्रमित होण्याची आणि त्यामुळे आयपीएलला मुकण्याची भीती वाटत होती, त्यामुळे पाचवा कसोटी सामना रद्द करम्यात आला. एका आठवड्यात आयपीएल सुरू होईल आणि खेळाडू आनंदात इकडून-तिकडे पळताना दिसतील. परंतु भारतीय खेळाडूंनी आरटीपीसीआर चाचणीवर विश्वास दाखवायला हवा होता. या विषाणूबाबत आता आपण सर्व काही जाणून असून याचा योग्य पद्धतीने सामना केला जावू शकतो.’
मला याचे आश्चर्य वाटते की मँचेस्टर कसोटी सामना खेळण्यासाठी भारतीय संघ आपल्या 20 सदस्य संघातून 11 खेळाडू मैदानात उतरवू शकला नाही. काही खेळाडूंना हा सामना खेळायचा नसेल तर ठीक आहे. परंतु भारताने आपला अंतिम 11 खेळाडूंचा संघ मैदानात उतरवण्यासाठी प्रयत्न करायला हवा होता. असही वॉनन म्हंटल आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- तीन आयपीएल संघांना मोठा धक्का; बड्या खेळाडूंची माघार
- Ind vs Eng: 2022 मध्ये घेतला जाईल टी-२० मालिकेचा निर्णय
- पंजाब किंग्जसला धक्का; डेव्हिड मलानची आयपीएलमधून माघार, ‘या’ खेळाडूला मिळाली संधी
- मुंबई इंडियन्सचे शिलेदार पोहोचले अबू धाबीमध्ये; सूर्या-रोहितने फोटो शेअर करत दिली माहिती
- ओबीसी समाजाला धक्का : राज्य सरकारला निवडणुका पुढे ढकलता येणार नाही – सर्वोच्च न्यायालय


