नागपूर : केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूरमध्ये एका कार्यक्रमाला हजेरी लावली होती. महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ (माफसू) नागपूरमार्फत शनिवारी पशुवैद्यकीय चिकित्सा संकुल इमारतीचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला. यावेळी गडकरी बोलत होते. या कार्यक्रमास राज्याचे पशूसंवर्धन मंत्री सुनील केदारही उपस्थित होते.
गडकरींनी विदर्भातील दुग्धोत्पादन दुप्पट करा. टार्गेट पूर्ण केलं तर गळ्यात फुलांची माळ पडेल, अन्यथा सक्तीची स्वेच्छानिवृत्ती दिली जाईल, या शब्दात गडकरींनी पशू आणि मत्स्य विज्ञान विद्यापीठाचे शास्त्रज्ञ आणि प्राध्यापकांना खडसावलं आहे.
गडकरी एवढ्यावरच न थांबता त्यांनी विचारणा केली की, या नव्या रुग्णालयात वर्षाला किती शस्त्रक्रिया करणार आहेत?, तसंच किती प्राण्यांवर उपचार केले जातील?, इतकंच काय तर जास्त दूध देणाऱ्या किती गायी तयार केल्या जातील? त्याचा आकडाही सांगा, अशा प्रश्नांचा भडीमारच गडकरींनी उपस्थितांना केला आहे.
Inaugurating upgraded and modernized teaching Veterinary Clinical Complex, Nagpur https://t.co/JHO07O861z
— Nitin Gadkari (@nitin_gadkari) September 11, 2021
दरम्यान तुम्हीच ठरवलेलं ट्रागेट जर तुम्ही पूर्ण करु शकलात, तर तुमच्या गळ्यात फुलांची माळ टाकू, नाहीतर तुम्हाला सक्तीची सेवानिवृत्ती देऊ, असा इशाराच गडकरींनी यावेळी दिला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- तीन आयपीएल संघांना मोठा धक्का; बड्या खेळाडूंची माघार
- Ind vs Eng: 2022 मध्ये घेतला जाईल टी-२० मालिकेचा निर्णय
- पंजाब किंग्जसला धक्का; डेव्हिड मलानची आयपीएलमधून माघार, ‘या’ खेळाडूला मिळाली संधी
- खाद्यतेलावरील आयात शुल्कात कपात, हा शेतकऱ्यांना आणखी एक धक्का – तुपकर
- ओबीसी समाजाला धक्का : राज्य सरकारला निवडणुका पुढे ढकलता येणार नाही – सर्वोच्च न्यायालय
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

