Share

‘भारतीय असल्यानं प्रत्येक सण साजरे करणार’; अर्शी खानचे ट्रोलर्सला सडेतोड उत्तर

Published On: 

मुंबई : घरोघरी गणेशाची स्थापना झाली आहे. दीड दिवसांपासून अकरा दिवसांपर्यंत बाप्पाची आराधना केली जाते.  बॉलीवूड कलाकार देखील गणेशोत्सव धूमधामात साजरा करतात. अनेक बॉलीवूड कलाकारांच्या घरी बाप्पाचे आगमन झाले आहे.

अभिनेत्री अर्शी खानने देखील गणरायाची स्थापना केल्यानंतर तिला सोशल मिडीयावर तिला प्रचंड ट्रोल करण्यात आले आहे. मात्र यानंतर तिने शांत न बसता ट्रोल करणाऱ्यांना  चांगले सुनावले आहे. गणपतीची पूजा करणे त्याचे काही फोटो आणि व्हिडिओ तिनं शेयर केला आहे. तिने व्हिडीओ शेअर करत म्हंटले की, मला मुस्लिम होण्याचा गर्व आहे. याबरोबरच मी भारतीय असल्यानं प्रत्येक सण साजरे करणार. अर्शीनं गणेश पूजा करतानाचा फोटो चाहत्यांसाठी सोशल मीडियावर पोस्ट करावा.’

https://www.instagram.com/p/CTp2o_9IAnE/?utm_source=ig_web_copy_link

‘यावरून मला काही मुस्लिम व्यक्तींनी देखील शिव्या दिल्या आहेत. दोन्ही धर्माच्या काही व्यक्ती मला दोष देत आहे. आपल्या एका व्हिडिओमध्ये अर्शी म्हणते, एक भारतीय नागरिक असल्याच्या अधिकारात मला वाटतं तो सण मी साजरा करु शकते. मग ती ईद असो किंवा दिवाळी. ज्यातून मला सर्वाधिक आनंद मिळणार आहे ती गोष्ट आपण का करु नये, हा माझा प्रश्न आहे.’

‘कृपया मला काय करावं हे सुचवू नका. मी मुस्लिम आहे, याचा मला गर्वही आहे. पण मी सगळे सण साजरे करणारच. या शब्दांत आपली नाराजी व्यक्त करताना तिनं गणेश चतुर्थीच्या आपल्या चाहत्यांना शुभेच्छाही दिल्या आहेत’. सध्या तिच्या या व्हिडीओ वरून तिचे काहीजण कौतुक करत आहे. तर काहीजण तिच्यावर टीका देखील करत आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!