मुंबई : ‘शरद पवार हे आमचे विठ्ठल आहेत’ अशा आशयाचं विधान शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मागील वर्षी ठाण्यात एका कार्यक्रमात बोलताना केलं होतं. राऊत यांच्या या विधानाचा भाजपनं तेव्हा निषेध केला होता. वाचाळवीर राऊत यांनी विठ्ठलनामाचं पावित्र्य घालवल्याची टीका भाजपनं केली होती. आता महाविकास आघाडीच्या सरकारनं पायी वारीवर बंदी घातल्यानंतर भाजपनं पुन्हा सरकारला घेरलं आहे.
भाजपचे नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांनी ‘महाराष्ट्र देशा’ केलेली बातमी ट्वीट करत उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल चढवला आहे. भातखळकर यांनी हे ट्वीट करताना ‘महाराष्ट्र देशा’ ने केलेल्या मागच्या वर्षीची वारकऱ्यांच्या प्रतिक्रियेची बातमीही पोस्ट केली आहे. या बातमीत शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी केलेल्या विधानावर वारकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.
संजय राऊत यांच्या त्या वक्तव्याचा आधार घेत भातखळकर यांनी मुख्यमंत्र्यांना लक्ष्य केलं आहे. ‘सरकारी कार्यक्रम धूमधडाक्यात साजरे करणाऱ्या खंडणी सरकारने आषाढी एकादशीच्या वारीवर मात्र बंदी घातली. आपल्या संतप्त भावनांना वारकऱ्यांनी अचूक शब्दात व्यक्त केले आहे. उद्धव ठाकरे, आषाढी एकादशीला तुम्ही शरद पवारांनाच अभिषेक करा. म्हणजे थोडक्यात तुमच्या योग्यतेप्रमाणे काम करा.’ अशा आशयाचे ट्वीट करत त्यांनी ठाकरे सरकारवर टीकास्त्र डागलेले आहे.’
सरकारी कार्यक्रम धूमधडाक्यात साजरे करणाऱ्या खंडणी सरकारने आषाढी एकादशीच्या वारीवर मात्र बंदी घातली. आपल्या संतप्त भावनांना वारकऱ्यांनी अचूक शब्दात व्यक्त केले आहे…
उद्धव ठाकरे, आषाढी एकादशीला तुम्ही शरद पवारांनाच अभिषेक करा.
म्हणजे थोडक्यात तुमच्या योग्यतेप्रमाणे काम करा???????????? pic.twitter.com/Ys1BK70PqU— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) July 14, 2021
भाजपच्या आध्यात्मिक आघाडीनं यंदाच्या वर्षी सुरुवातीपासूनच पायी वारीचा हट्ट धरला होता. कोणत्याही परिस्थितीत पायी वारी होणारच, अशी भूमिका भाजपनं घेतली होती. मात्र, राज्य सरकारनं केवळ मानाच्या पालख्या मोजक्या वारकऱ्यांच्या उपस्थितीत एसटी बसमधून नेण्याची परवानगी दिली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- “२०१४ प्रमाणे पुन्हा धोका मिळू नये यासाठीच….,” पटोलेंनी पुन्हा एकदा राष्ट्रवादीला डिवचले
- करन्सी नोट प्रेसमधील 5 लाख चोरी प्रकरण, नाशिक पोलिसांच्या तपासाला सुरवात
- झोटिंग समितीची खडसेंना क्लीन चिट नव्हती, मंत्रिपदाचा गैरवापर केल्याचा आरोप?
- ‘संजय राऊत यांनी माझ्या मनातलं बरोबर ओळखलं आणि तेच अग्रलेखात लिहिलं’
- झोटिंग समितीचा गायब अहवाल सापडला, एकनाथ खडसेंच्या अडचणी वाढणार?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

