मुंबई – महाविकास आघाडीत धुसफूस सुरूच असल्याचे चित्र आहे. कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी २०१४ मध्ये मिळालेल्या धोक्याची आठवण करून दिली आहे. २०१४ मधील घडामोडींची आठवण करून देत पटोलेंनी थेट खा. शरद पवारांशी पंगा घेतल्याचं बोललं जात आहे.2014 मध्ये झाला तसा धोका होऊ नये म्हणून स्वबळाची तयारी करतो आहोत असं सांगत यावेळी त्यांनी अप्रत्यक्षपणे राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा साधला आहे.
‘आमची लाईन ठरलेली आहे. स्वबळाच्या मुद्द्यावर आम्ही कायम आहोत. कारण याआधी आम्ही अनेक धक्के सहन केले आहेत. २०१४ मध्ये मिळालेला धोका पुन्हा मिळू नये यासाठी आम्ही स्वबळाची तयारी सुरू केली आहे,’ असं नाना पटोले म्हणाले. २०१४ मधील घटनांची आठवण करून देत पटोलेंनी राष्ट्रवादीबद्दल अविश्वास व्यक्त केला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीतील धुसफूस पुन्हा एकदा समोर आली आहे.
दरम्यान, आगामी निवडणुकीत काँग्रेसला क्रमांक एकचा पक्ष बनवण्यासाठी नाना पटोले यांनी कंबर कसली आहे. त्यामुळे पटोले वारंवार स्वबळाची भाषा करत राष्ट्रवादीसह शिवसेनेच्या नेत्यांनाही लक्ष्य करत आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीत वादाची ठिणगी पडल्याचे दिसत आहे.
या पार्श्वभूमीवर पवार यांनी मंगळवारी रात्री त्यांच्या निवासस्थानी काँग्रेस नेत्यांची बैठक बोलावली होती. मात्र या बैठकीला नाना पटोले यांना निमंत्रित करण्यात आले नाही. काल शरद पवारांच्या मुंबईतल्या निवासस्थानी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी एच. के. पाटील, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्यात खलबतं झाली त्यामुळे उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.
दरम्यान, जर वेगळं लढण्याचं ठरलं असेल तर आधीच सांगा, जेणे करुन आम्ही देखील तयारीला लागू…अशा शब्दात खा. शरद पवारांनी स्वबळाचे नारे देणाऱ्या काँग्रेसला सूचना वजा इशारा दिलाय.धक्कादायक वक्तव्यांनी महाविकास आघाडीला हादरे देणाऱ्या नाना पटोलेंना हायकमांडचा पाठिंबा आहे का अशी विचारणा देखील पवारांनी केल्याचं समजतंय.
महत्वाच्या बातम्या
- करन्सी नोट प्रेसमधील 5 लाख चोरी प्रकरण, नाशिक पोलिसांच्या तपासाला सुरवात
- झोटिंग समितीची खडसेंना क्लीन चिट नव्हती, मंत्रिपदाचा गैरवापर केल्याचा आरोप?
- ‘संजय राऊत यांनी माझ्या मनातलं बरोबर ओळखलं आणि तेच अग्रलेखात लिहिलं’
- झोटिंग समितीचा गायब अहवाल सापडला, एकनाथ खडसेंच्या अडचणी वाढणार?
- आर्यलँडचा दक्षिण आफ्रिकेवर ४३ धावांनी धक्कादायक विजय
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

