मुंबई – एकनाथ खडसे यांच्या भोसरी जमीन घोटाळ्याच्या चौकशीसाठी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी झोटिंग समिती नेमली होती. या समितीच्या अहवालावरून एकनाथ खडसे यांना क्लीन चिट देण्यात आली होती. आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी झोटिंग समितीचा अहवाल मंत्रालयातून मागवला असता अहवाल गायब झाल्याचं उत्तर अजित पवारांना मिळालं होतं.
दरम्यान, हे वृत्त समोर आल्यानंतर सर्वत्र एकच खळबळ उडाली होती.दिवसभर उलटसुलट चर्चा झाल्यानंतर अखेर हा अहवाल सापडला आहे. या अहवालात खडसेंवर ताशेरे ओढण्यात आल्याचे समजते आहे. हा अहवाल उघड करण्यात आलेला नाही. मात्र यामुळे खडसे यांच्या अडचणी वाढणार असल्याचे बोलले जात आहे.
वैयक्तिक उद्देशासाठी सत्तेचा गैरवापर केल्यास त्याला कायदेशीर मान्यता देता येत नाही. खडसेंनी त्यांच्या स्वत:च्या किंवा पत्नी आणि जावयाच्या फायद्यासाठी पदाचा गैरवापर केला. एमआयडीसीच्या जमिनी संदर्भात माहितीचा वापर करुन, खडसेंनी गोपनियतेच्या शपथेचा भंग केला. जमिनीच्या मूळ मालकाला भरपाई देण्याऐवजी, पत्नी आणि जावयाला फायदा करुन दिला. पत्नी आणि जावयाच्या नावावर जमीन करुन देताना आचारसंहितेचाही भंग केला असल्याचे या अहवालात म्हटले असल्याचे सांगितले जात आहे.
खडसेंचा निर्णय राज्य सरकारसाठी अवमानकारक होता. तसेच खडसेंना जमीन व्यवहाराची पूर्ण माहिती होती, पण निर्दोष असल्याची खोटी भूमिका त्यांनी घेतली. एमआयडीसी कायद्यानुसार महसूल मंत्र्यांची सर्व व्यवहारात कोणतीही भूमिका नसते. तरीही अधिकार नसताना खडसेंनी 12 एप्रिल 2016 रोजी जमीन व्यवहाराबाबत एमआयडीसी अधिकाऱ्यांची बैठक घेतली. महसूल मंत्री म्हणून खडसे हे सर्व शासकीय जमिनीचे संरक्षक होते. पण पत्नी आणि जावयाच्या नावावर त्यांनी जमीन करुन विश्वासाचे उल्लंघन केले. तसेच जमीन व्यवहारातील खडसेंची भूमिका ही त्यांना मंत्रिपदावर राहण्यास परावृत्त करते, असा निष्कर्ष झोटींग समितीच्या अहवालात काढला आहे असे सांगण्यात येत आहे.
महत्वाच्या बातम्या
- करन्सी नोट प्रेसमधील 5 लाख चोरी प्रकरण, नाशिक पोलिसांच्या तपासाला सुरवात
- लडाख कचरा प्रकरणावर आमिरच्या टीमने सोडलं मौन, म्हणाले….
- ‘संजय राऊत यांनी माझ्या मनातलं बरोबर ओळखलं आणि तेच अग्रलेखात लिहिलं’
- झोटिंग समितीचा गायब अहवाल सापडला, एकनाथ खडसेंच्या अडचणी वाढणार?
- आर्यलँडचा दक्षिण आफ्रिकेवर ४३ धावांनी धक्कादायक विजय
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
