🕒 1 min read
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून दसरा मेळाव्यावरून राज्याचं राजकीय वातावरण तापलं आहे. दसरा मेळाव्यात शिवसेना आणि एकनाथ शिंदे गट दोन्ही गट आपली ताकद दाखवण्याच्या तयारीत आहेत. यावेळी दोन शिवसेना गट तयार झाल्याने दसरा मेळावा कोण घेणार? अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. तर दुसरीकडे आज शिवसेनेच्या वतीने नेस्को सभागृहात कार्यकर्ता मेळाव्याचं आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्या मध्ये उद्धव ठाकरे यांनी भाजप-शिंदे सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. त्यांच्या भाषणाकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या होत्या.
संध्याकाळी साडेसात वाजता उद्धव ठाकरे यांच्या भाषणाला सुरूवात झाली. यासाठी शिवसेनेकडू्न जय्यत तयारी करण्यात आली होती. यावेळी सुरवातीलाच बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले कि, व्यासपीठावर आल्यानंतर आधी पाहिले आमचे वडील आहेत, का जागेवर ते पाहिलं. आतापर्यंत मुलं पळवणारे पाहिले होते. आता बाप पळवणारेही आल्याची जहरी टीका उध्दव ठाकरे यांनी शिंदे गटावर केली.
दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळात पातशाह होते, आदिलशाह, निजामशाह होते. त्यांच्याच कुळातले शाह आत्ता काही दिवसांपूर्वी येऊन गेले. अमित शाह देशाचे गृहमंत्री ते काय म्हणाले की शिवसेनेले जमीन दाखवायची. आपल्याला जमीन दाखवायची आहे असं म्हणणाऱ्यांना आपण आस्मान दाखवल्याशिवाय राहणार नाही असं म्हणत उद्धव ठाकरेंनी अमित शाह यांच्या टीकेला उत्तर दिलं आहे.
महत्वाच्या बातम्या :
- राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा : टेबल टेनिसमध्ये महाराष्ट्राच्या महिलांना रौप्य तर पुरुषांना कांस्य पदक
- Diabetes Remedies | शुगरच्या रुग्णांसाठी ओवा आहे रामबाण उपाय,जाणून घ्या!
- Dark spot on face | ‘हे’ घरगुती उपाय वापरुन तुमचा चेहरा होईल डाग मुक्त,जाणून घ्या!
- Hair Care | केसांच्या समस्या अनेक मात्र उपाय केवळ एक, जाणून घ्या ‘हा’ एक उपाय
- Solapur | कौतुकास्पद! राज्यस्तरीय सॉफ्ट टेनिस स्पर्धेत सोलापूरचे वर्चस्व
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
