Share

Uddhav Thackeray | महिनाभरात निवडणुका घ्या, उद्धव ठाकरे यांचे सत्ताधाऱ्यांना आव्हान

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : दसरा मेळाव्यात शिवसेना आणि एकनाथ शिंदे गट हे दोन्ही गट आपली ताकद दाखवण्याच्या तयारीत आहेत. यावेळी दोन शिवसेना गट तयार झाल्याने दसरा मेळावा कोण घेणार? अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. तर दुसरीकडे काल शिवसेनेच्या वतीने नेस्को सभागृहात कार्यकर्ता मेळाव्याचं आयोजन करण्यात आले होतं. त्याचबरोबर आपल्याला माहित आहे की, सध्या मुंबई महानगरापालिकेच्या निवडणूकांचं वारं घुमू लागलं आहे. त्यामुळे या मेळाव्यामध्ये उद्धव ठाकरे यांच्याकडून भाजप पक्षाला एक आव्हान देण्यात आलं आहे.

काय म्हणाले उद्धव ठाकरे ?

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी हिंमत असेल तर महिनाभरात. मुंबई महापालिका आणि राज्य विधानसभा निवडणूक घेऊन दाखवावी, असे आव्हान उद्धव ठाकरे यांनी भाजप दिले आहे. काल व्यासपिठावर असताना ते बोलत होते.

पुढे बोलताना ठाकरे म्हणाले, ही आपली पहिली निवडणूक आहे, असे मानून संपूर्ण ताकदीने लढण्याचे आवाहन त्यांनी शिवसैनिकांना केले आहे. तर ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ही शेवटची निवडणूक असेल,असंही त्यांनी म्हटलं आहे.

तसेच, काल संध्याकाळी साडेसात वाजता उद्धव ठाकरे यांच्या भाषणाला सुरूवात झाली. यासाठी शिवसेनेकडू्न जय्यत तयारी करण्यात आली होती. त्यावेळी सुरूवातीलाच बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, आधी पाहिले आमचे वडील जागेवर आहेत का ते पाहिलं. आतापर्यंत मुलं पळवणारे पाहिले होते. आता बाप पळवणारेही आल्याची जहरी टीका उध्दव ठाकरे यांनी शिंदे गटावर केली.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!