Share

“महाराष्ट्र देशातला सगळ्यात सडका…”, ईडीच्या धाडींवर मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया

Published On: 

मुंबई : काही दिवसांपूर्वीच आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी ईडीकडून राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांना अटक करण्यात आली. या प्रकरणानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आल्याचे बघायला मिळाले. दरम्यान, ईडीकडून राज्यातील सत्ताधारी पक्षांच्या नेत्यांवर होणाऱ्या कारवाईबाबत आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

एका कार्यक्रमात या संदर्भात विचारण्यात आले असता मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की,‘तुम्ही महाराष्ट्राचा देशासाठी आधार म्हणून उपयोग का करत नाही?’, असा सवाल मुख्यमंत्र्यांनी केला. तसेच महाराष्ट्र जणूकाही देशातला सगळ्यात सडका भाग आहे अशा पद्धतीने सध्या राजकारण सुरु आहे. धाडीमागून धाडी सुरू आहेत. ठीक आहे. प्रत्येकाचे दिवस असतात, दिवस बदलतात’, असे ठाकरे म्हणाले.

दरम्यान, पुढे ते म्हणाले की,‘बंगाल आणि महाराष्ट्र सोडला तर इतर राज्यांत या केंद्रीय तपास यंत्रणांकडे यंत्रणाच नाही का? गुजरातमध्ये मोठा घोटाळा बाहेर पडला. तिथे बंदरावर किती मोठ्या प्रमाणावर अंमली पदार्थ सापडले होते. आपल्याकडे चिमूटभर सापडले तर केवढा गहजब केला जातो.’ तसेच महाराष्ट्रात भ्रष्टाचार सुरू असून महाराष्ट्रात गांजाची शेती फुललेली आहे, घराघरात टेरेसमध्ये गांजाच गांजा आहे म्हणून महाराष्ट्राला बदनाम करायचे हे षडयंत्र आहे, असेही ठाकरे यावेळी म्हणाले.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!