Share

‘भारतीयांना मायदेशी आणण्यासाठी केंद्र सरकार सज्ज’ – नितीन गडकरी

Published On: 

नवी दिल्ली: रशियन हल्ल्यांमुळे युक्रेनमध्ये विध्वंस होत आहे. ताज्या अपडेटनुसार रशियन सैन्य युक्रेनची राजधानी कीव येथे पोहोचले आहे. यापूर्वी आज कीववर सहा वेळा क्षेपणास्त्र हल्ला झाला होता. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की असहाय्य दिसत असून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनीही हात वर केले आहेत. या हल्ल्यात हजारो भारतीय अडकले आहेत त्यांच्यात देखील भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

रशिया-युक्रेन युद्धाने सारे जग होरपळून निघत आहे. भारतातले अनेक नागरिक आणि जवळपास २० हजार विद्यार्थी सध्या युक्रेनमध्ये अडकल्याचे समोर येत आहे. या विद्यार्थ्यांना आणि भारतीयांना मायदेशी आणण्यासाठी केंद्र सरकारने कंबर कसलीय. युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना मायदेशी परत आणण्यासाठी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यात चर्चा झाली असल्याची माहिती स्वतः गडकरी यांनी दिलीय.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!