🕒 1 min read
मुंबई: रशिया युक्रेनवर हल्ला करत असताना रशियाचा स्टार टेनिसपटू डॅनिल मेदवेदेव यूएस ओपनमध्ये नोव्हाक जोकोव्हिच पराभूत झाल्यानंतर सोमवारी (२८ फेब्रुवारी) औपचारिक क्रमवारी जाहीर झाल्यानंतर टेनिस मेन्स नंबर १ बनणार आहे. हा खिताब जिंकल्यानंतर त्याने जगात शांतता प्रस्थापित असावी असे सांगितले आहे. तब्बल २१ वर्षानंतर एक रशियन खेळाडू नंबर १ ठरणार आहे. २००४ नंतर अँडी मरे , नोव्हाक जोकोव्हिच , रॉजर फेडरर आणि राफेल नदाल शिवाय पहिल्यांदाच एक नवीन नाव मेन्स नंबर १ च्या यादीत दाखल होईल.
माजी यूएस ओपन चॅम्पियन मरात सफिन हा मेन्स नंबर १ मिळवणारा शेवटचा रशियन पुरुष टेनिसपटू होता. नोव्हेंबर २००० ते एप्रिल २००१ दरम्यान एकूण ९ आठवडे साफीनने प्रथम क्रमांकावर स्थान पटकावले होते. महिला टेनिसमध्ये, मारिया शारापोव्हा २२ ऑगस्ट २००५ रोजी वयाच्या १८ व्या वर्षी प्रथमच जागतिक क्रमवारीत नंबर १ बनली. तसेच एकेरी क्रमवारीत अव्वल स्थान मिळवणारी पहिली रशियन महिला टेनिसपटू ठरली आणि शेवटच्या वेळी ११ जून २०१२ ते ८ जुलै २०१२ पर्यंत चार आठवडे तिने पाचव्यांदा रँकिंग राखली होती.
1⃣ @DaniilMedwed will be the @atptour number one on Monday
Medvedev becomes 1st No. 1 other than @DjokerNole, @rogerfederer, @RafaelNadal and @Andy_Murray since 1 February 2004. pic.twitter.com/ger2iKNtth
— Roland-Garros (@rolandgarros) February 24, 2022
मेदवेदेवच्याच देशातला आंद्रे रुबलेव्ह, जागतिक क्रमवारीत सातव्या क्रमांकावर आहे. त्याने युक्रेनियन डेनिस मोल्चानोव्हसोबत गेल्या आठवड्यात मार्सेलमध्ये दुहेरीचे विजेतेपद पटकावले होते. मेदवेदेवने रुबलेव्ह आणि डेनिसच्या भागीदारीचा संबंध घेत सांगितले “हे आश्चर्यकारक होते कारण मला वाटते की लोकांना एकत्र राहण्याची गरज आहे आणि ते सर्वात महत्वाचे आहे,”
महत्वाच्या बातम्या
- पालकमंत्री बच्चू कडू जनता दरबारी; एकाच दिवशी अनेक प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न
- मुसलमान म्हणजे दहशतवाद्यांशी संबंध आहेच असं होत नाही- सना मलिक
- मुलाच्या अटकपूर्व जामीनासाठी किरीट सोमय्या दिल्लीत दाखल; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
- भुजबळांकडे छातीत कळ आणण्याचे उपाय? मोहित कंबोज यांचे ट्वीट ठरतेय चर्चेचा विषय
- IPL 2022: पॅट कमिन्स आणि डेव्हिड वॉर्नर सुरुवातीच्या सामन्यांना मुकणार ; ‘या’ तारखेला संघाशी जोडले जाणार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
