Share

भारताने एकतर्फी सामना जिंकला ; कर्णधार रोहित मात्र खेळांडूवर भडकला

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: लखनऊ येथे झालेला भारत आणि श्रीलंका यांच्यातील पहिला टी-२० सामना भारताने ६२ धावांनी जिंकला. संपूर्ण सामन्यात भारतीय खेळाडूंनी श्रीलंका संघाचे वर्चस्व एकवेळही जाणवू दिले नाही. भारतीय संघाच्या सलामीच्या जोडीने सामना विजय जवळपास निश्चित केला होता. श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर फलंदाजीला आलेल्या रोहित शर्मा आणि ईशान किशन यांनी सुरेख सुरुवात करून दिली. मोठ्या अंतराने सामना जिंकूनही रोहित मात्र काही खेळाडूंवर नाराज दिसला.

झाल अस की , वेस्ट इंडिजविरुद्ध चांगली कामगिरी करणाऱ्या व्यंकटेश अय्यरने भुवनेश्वर कुमारच्या षटकात अतिशय सोपा झेल सोडला होता. त्यामुळे रोहित चांगलाच संतापलेला दिसला. सामन्यानंतर तो म्हणाला, “आम्ही सातत्याने खूप सोपे कॅच सोडत आहोत. आमच्या क्षेत्ररक्षण प्रशिक्षकाला अजून खूप काम करायचे आहे. मिशन ऑस्ट्रेलियापूर्वी आम्हाला एक चांगला क्षेत्ररक्षण करणारा संघही तयार करायचा आहे आणि असे कॅच सोडणे जास्त सहन केले जाणार नाही.”

कर्णधार रोहित शर्माने ३२ चेंडूत ४४ धावा केल्या. त्याच्या सोबत भागीदारीतईशान किशनने अवघ्या ५६ चेंडूत ८९ धावा केल्या. यानंतर श्रेयस अय्यरनेही तुफानी खेळी करत २८ चेंडूत ५७ धावा केल्या. अशाप्रकारे भारताने श्रीलंकेसमोर २०० धावांचे लक्ष्य ठेवले आहे. प्रत्युत्तरात श्रीलंकेचा संघ २० ओव्हरमध्ये ६ गडी गमावून केवळ १३७ धावा करू शकला. श्रीलंकेकडून चारिथ अस्लंका हा एकमेव खेळाडू होता जो अर्धशतक झळकावू शकला.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!