Share

‘भ्रष्‍टाचाराची प्रकरणे उघडे पडण्याची भीती असल्यानेच…’ विखे पाटलांची महाविकास आघाडीवर टीका

Published On: 

अहमदनगर: राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते नवाब मलिक यांना ईडीने अटक केल्यानंतर महाविकास आघाडी सरकारचे नेते आक्रमक झाले आहेत. मलिकांच्या अटकेच्या निषेधार्थ आंदोलन देखील करण्यात आलं. तर दुसरीकडे मलिकांच्या मंत्रीपदाच्या राजीनाम्याची मागणी भाजप नेत्यांकडून केली जात आहे. एकंदरतीच महाविकास आघाडी सरकार आणि भाजपमध्ये तानावाचे वातावरण निर्माण झाले असल्याचे बघायला मिळत आहे. आमदार विखे पाटील यांनी देखील यावर प्रतिक्रिया दिली आहे.

केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर होत असल्‍याच्‍या महाविकास आघाडीच्‍या नेत्‍यांकडून होत असलेल्‍या आरोपाचा फेटाळून विखे पाटील म्‍हणाले की, केवळ आपले अपयश झाकण्‍यासाठी असे आरोप केले जात आहेत. भ्रष्‍टाचाराची प्रकरण उघड होतील अशी भिती असल्‍यानेच जनतेचे लक्ष विचलीत करण्‍याचे काम महाविकास आघाडीच्‍या नेत्‍यांकडून होत असल्‍याचे त्‍यांनी स्‍पष्‍ट केली.

आघाडी सरकारमधील कॉंग्रेसच्‍या सहा मंत्र्यांच्‍या खात्‍यांमध्‍ये होत असलेल्‍या संभाव्‍य बदल्यांच्‍या चर्चेवर भाष्‍य करताना विखे पाटील यांनी कॉंग्रेसला आपली प्रतिमा सुधरायची असेल तर, आघाडी सरकारमधून बाहेर पडले पाहीजे. परंतू भ्रष्‍टाचाराच्‍या विळख्‍यात ते अडकले आहेत. मंत्री राहीलो तर संरक्षण मिळेल आणि सत्‍तेतून बाहेर पडलो तर बेड्या पडतील अशी भिती त्‍यांना सतावत असल्‍यानेच ते होणे शक्‍य नाही. त्‍यामुळे कॉंग्रेसच्‍या भवितव्‍याची कोणालाही चिंता नसल्‍याचा टोला त्‍यांनी लगावला.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!