Share

“उद्धव ठाकरेंनी राजीनामा द्यावा”, नारायण राणेंची मागणी

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: आताच राज्यसभा निवडणुकांचा निकाल लागला आहे. राज्यसभेच्या निवडणुकीत जागांच्या अंकगणिताच्या आधारे उमेदवार उभे केले तर विजय निश्चित असतो आणि त्यामुळेच बहुतांश उमेदवार बिनविरोध विजयी होतात. पण इथे एक आव्हान होतं. ही लढत भाजप विरुद्ध महाविकास आघाडी यांच्यात होती. मात्र थेट भाजपचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. शिवसेना विजयाची स्वप्ने पाहत राहिली आणि फडणवीस यांनी रणनीतीच्या क्षेत्रात स्वत:ला ‘सिद्ध’ केले. रात्री उशिरापर्यंतच्या गदारोळानंतर निकाल येताच भाजपने शिवसेनेला मोठा धक्का दिला. तीन मोठ्या पक्षांची युती करून सरकार चालवणाऱ्या शिवसेनेला पुरेसे संख्याबळ असूनही संजय पवार यांना  परावभ पचवावा लागला. आता यानंतर भाजप नेते तथा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

राज्यसभा निवडणूक होण्यापूर्वी काहीजण बढाया मारत होते. पण त्यांना स्वत:चे आमदारही वाचवता आले नाही. इतिहासात कुठल्याही मुख्यमंत्र्यांनी जी भाषा वापरली नाही त्या भाषेत उद्धव ठाकरे बोलत होते. फडणवीसांवर टीका करत होते. उद्धव ठाकरेंवर नामुष्की आली असून असे मुख्यमंत्री महाराष्ट्राला लाभणे हे राज्याचे दुर्दैव आहे. अशी टीका नारायण राणे यांनी केली आहे.

तसेच सत्तेसाठी १४५ जणांचा पाठिंबा लागतो. मात्र तुम्ही अल्पमतात असल्यामुळे तुम्ही राजीनामा द्या. तुम्हाला सत्तेत राहण्याचा नैतिक अधिकार नाही. असे नारायण राणे यांनी म्हटले आहे. दरम्यान राज्यसभेच्या राज्यातील सहा जागांसाठी झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे उमेदवार प्रफुल्ल पटेल यांना पहिल्या पसंतीची 43, शिवसेनेचे  संजय राऊत यांना 41, काँग्रेसचे इम्रान प्रतापगढी यांना 44, तर भाजपचे उमेदवार अनिल बोंडे आणि पीयूष गोयल यांना पहिल्या पसंतीची अनुक्रमे 48 मतं मिळाली आहेत. तर शिवसेनेने सहाव्या जागेसाठी निश्चित केलेले कोल्हापूरचे संजय पवार पराभूत झाले तर भाजपचे धनंजय महाडिक विजयी झाले आहे.

महत्वाच्या बातम्या: 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!