मुंबई: राज्यात सध्या राज्यसभा निवडणुकाच्या निकालावरून राजकारण चांगलेच रंगताना दिसून येत आहे. राजकीय क्षेत्रातील अनेक प्रतिक्रियांनी सध्या महाराष्ट्रातील राजकारण तापले आहे. कारण ही निवडणूक भाजप विरुद्ध महाविकास आघाडी अशी होती. यात राष्ट्रवादीचे उमेदवार प्रफुल्ल पटेल यांना पहिल्या पसंतीची 43, शिवसेनेचे संजय राऊत यांना 41, काँग्रेसचे इम्रान प्रतापगढी यांना 44, तर भाजपचे उमेदवार अनिल बोंडे आणि पीयूष गोयल यांना पहिल्या पसंतीची अनुक्रमे 48 मतं मिळाली आहेत. तर शिवसेनेने सहाव्या जागेसाठी निश्चित केलेले कोल्हापूरचे संजय पवार पराभूत झाले तर भाजपचे धनंजय महाडिक विजयी झाले आहे. यानंतर मविआ नेत्यांनी अनेक आरोप-प्रत्यारोप केले आहेत. यावरूनच भाजप नेते निलेश राणे यांनी आता थेट अजित पवारांवर निशाणा साधला आहे.
राज्यसभा निवडणुकाच्या निकालावर अजित पवार यांनी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. यावरूनच “अडचणीचे ढग दिसले की अजित पवार मिस्टर इंडिया सारखे गायब होतात. इतिहास सांगतो जेव्हा असामान्य परिस्थिती निर्माण होते तेव्हा अजित पवार गुल पण बरं झालं अजित पवार यात पडले नाही कारण पहाटेच्या शपथविधीला त्यांच्यासोबत त्यांच्याच पक्षातले आमदार राहिले नाही ते बाहेरून आमदार कुठून आणणार.”, असा टोला निलेश राणे यांनी लगावला आहे.
अडचणीचे ढग दिसले की अजित पवार मिस्टर इंडिया सारखे गायब होतात. इतिहास सांगतो जेव्हा असामान्य परिस्थिती निर्माण होते तेव्हा अजित पवार गुल पण बरं झालं अजित पवार यात पडले नाही कारण पहाटेच्या शपथविधीला त्यांच्यासोबत त्यांच्याच पक्षातले आमदार राहिले नाही ते बाहेरून आमदार कुठून आणणार.
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) June 12, 2022
दरम्यान राज्यसभा निवडणुकीवर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया देत भाजपवर टीका केली होती. काहीना ईडीची भीती तर काही जणांना वेगळी ताकद देऊन मत परिवर्तन केल्याचा आरोप रोहित पवारांनी केला होता. यावरही निलेश राणे यांनी ट्वीट करत प्रत्युत्तर दिले आहे.
“राष्ट्रवादीचे राज्यपाल रोहित पवार यांची प्रतिक्रिया बघितली. राज्यपाल रोहित पवार यांनी आजोबांकडे लक्ष द्यावे कारण आजोबा नेमके काय करतात हे कोणालाच सांगत नसल्यामुळे तुमच्या बरोबर महाविकास आघाडीची पण अडचण झाली आहे.”, असा टोला निलेश राणे यांनी लगावला आहे.
महत्वाच्या बातम्या:
- “महिलांची कशी प्रतिमा तयार करताय? माफी मागा अन्यथा..” दिपाली सय्यद यांचा अमृता फडणवीसांना इशारा
- गांगुली माजी खेळाडूंवर बोलताना म्हणाले, ” मी कधीही सचिन तेंडुलकर, अझरुद्दीन आणि द्रविड यांना…”
- “राज्यपाल रोहित पवार यांनी आजोबांकडे लक्ष द्यावे कारण…”, निलेश राणेंचा टोला
- IND vs SA : ‘हा’ माजी खेळाडू म्हणाला, “दुसऱ्या टी-२० सामन्यात पडेल धावांचा पाऊस…”
- भाजपला ज्यादा मतदान हे आधीच कसे कळले? फडणवीसांची चौकशी झाली पाहिजे – दिपाली सय्यद
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

