🕒 1 min read
नवी दिल्ली : भारताला या वर्षी स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे पूर्ण होत आहेत. हा सोहळा खास बनवण्यासाठी देशात अमृत महोत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे. यानिमित्ताने कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर एका खास क्रिकेट सामन्याचे आयोजन करण्यात येणार आहे. हा सामना लिजेंड्स क्रिकेट लीग अंतर्गत खेळवला जाईल. तसे, ही लीग १६ सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. पण त्याच्या एक दिवस आधी म्हणजेच १५ सप्टेंबरला इंडीया महाराजा आणि सौरव गांगुली याच्या नेतृत्वाखालील वर्ल्ड जायंट्स यांच्यात सामना होणार आहे. हा सामना भारतीय स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्षाच्या समारंभाला समर्पित असेल. आयोजकांनी आज (शुक्रवार) ही माहिती दिली.
एलएलसीचे उपायुक्त रवी शास्त्री यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, “आम्ही आमचे स्वातंत्र्याचे ७५ वे वर्ष साजरे करत आहोत हा आमच्यासाठी अभिमानाचा क्षण आहे. या वर्षी लीग स्वातंत्र्याचा ७५ दिनाला समर्पित असेल, हे सांगताना मला अत्यंत आनंद होत आहे.”
चार संघ स्पर्धेत सहभागी होणार-
इंडिया महाराजाचे नेतृत्व भारताचे माजी कर्णधार आणि भारतीय क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष सौरव गांगुली करतील तर वर्ल्ड जायंट्सचे नेतृत्व इंग्लंडचा २०१९ विश्वचषक विजेता कर्णधार इऑन मॉर्गन करेल. एलएलसीची दुसरी स्पर्धा या विशिष्ट सामन्याच्या दुसऱ्या दिवशी १६ सप्टेंबर रोजी सुरू होईल. या स्पर्धेत चार संघ सहभागी होणार असून २२ दिवसांत १५ सामने खेळवले जाणार आहेत.
As we celebrate India@75 by dedicating the upcoming season, we have a special match between India @IndMaharajasLLC and World @WorldGiantsLLC.
#LegendsLeagueCricket #AzadiKaAmritMahotsav @RaviShastriOfc @Sganguly99 @Eoin16 @AmritMahotsav @anurag_office pic.twitter.com/UYcfJxVX8o— Legends League Cricket (@llct20) August 12, 2022
लिजेंड्स लीग क्रिकेटचा पहिला सीझन या वर्षी जानेवारीमध्ये मस्कट येथे इंडिया महाराजा, वर्ल्ड जायंट्स आणि एशिया लायन्स या तीन संघांमध्ये खेळला गेला आणि त्यात एकूण ७ सामने झाले. सीझन २ मध्ये चार संघ भाग घेतील.
महत्वाच्या बातम्या :
- Devendra Fadnavis | बापू कुटीमध्ये आल्यानंतर आत्मिक समाधान आणि आनंद मिळतो – देवेंद्र फडणवीस
- Udayanaraje Bhosale। “…मग मी शिवसेना माझीच म्हणायला पाहिजे”; उदयनराजेंच मोठं वक्तव्य
- Allu Arjun | मद्य कंपनीची १० कोटींची ऑफर अल्लू अर्जुनने नाकारली; सोशल मीडियातून कौतुक
- Girish Mahajan | “आता डबल इंजिनचं सरकार,राज्यात…” ; गिरीश महाजन यांची प्रतिक्रिया!
- Loksabha Election Survey | “आज लोकसभा निवडणूक झाली तर…” ; भाजप-शिंदे गटाला धक्का देणारा सर्व्हेचा निकाल!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
