बेळगाव : महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद हा गेल्या अनेक दशकांपासून सुरु आहे. कर्नाटक हद्दीतील अनेक गावांची महाराष्ट्रात सामील होण्याची इच्छा आहे. मराठी भाषिकांची संख्या अधिक असलेल्या गावांना दुजाभावाची वागणूक दिली जाते. त्यांची कुंचबणा करून धमकावलं जातं, असे अनेक प्रकार समोर आले आहेत.
मराठी भाषिकांच्या हक्कासाठी व बेळगाव-निपाणी भागाचा महाराष्ट्रात समावेश करण्यासाठी स्थानिक नागरिक महाराष्ट्र एकीकरण समितीमार्फत लढा देत आहेत. दरम्यान, बेळगाव लोकसभा मतदारसंघाचे खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री सुरेश अंगडी यांच्या निधनानंतर या मतदारसंघात पोटनिवडणूक लागली आहे. येत्या १७ एप्रिलला बेळगाव लोकसभा मतदारसंघासाठी निवडणुकीचं मतदान होणार आहे. या जागेसाठी मराठी भाषिक एकवटले असून महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे शुभम शेळके या युवकाने शड्डू ठोकला आहे.
महाराष्ट्र एकीकरण समितीच्या या मराठमोळ्या उमेदवाराला शिवसेनेनं जाहीर पाठींबा दिल्याचे घोषित केले होते. एवढच नाही तर दोन दिवसांपूर्वी शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांनी शुभम शेळकेंच्या प्रचारासाठी बेळगावात येण्याचं जाहीर केलं होतं. त्यानुसार ते आज बेळगावात दाखल झाले आहेत. त्यांच्यासोबत शिवसेना खासदार धैर्यशील माने हे देखील बेळगावात आले आहेत. विमानतळावर आगमन होताच त्यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे.
‘मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशावरून मी बेळगावात आलो आहे. त्यांनी प्रचारात सक्रिय सहभाग घेण्यासाठी मला पाठवलं आहे. सुरुवातीला शुभम शेळके यांना ५० हजारच्या आसपास मते पडतील अशी निराशाजनक परिस्थिती होती. आता, लोकांचा प्रतिसाद बघता विजय निश्चित आहे,’ असं भाष्य संजय राऊत यांनी केलं आहे.
महत्वाच्या बातम्या
- राज्यात आजपासून लॉकडाऊन; काय सुरु, काय बंद ? वाचा एका क्लिकवर !
- येणारे दिवस अनिल देशमुखांसाठी कठीण असतील; भाजप नेत्याचे भाकीत
- आधी खात्यावर पैसे द्या मग लॉकडाऊन करा म्हणणाऱ्या चव्हाणांची भाषा बदलली, मुख्यमंत्र्यांना म्हणाले…
- आठवीतलं पोरगं पण सांगेल हे सरकार फार काळ टिकणार नाही – चंद्रकांत पाटील
- ‘तुम केहना क्या चाहते हो?’ निलेश राणेंनी उडवली मुख्यमंत्र्यांची खिल्ली


