Share

येणारे दिवस अनिल देशमुखांसाठी कठीण असतील; भाजप नेत्याचे भाकीत

Published On: 

मुंबई : आज राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख अखेर सीबीआयसमोर हजर झाले आहेत. ते डीआरडीओ गेस्ट हाऊसवर दाखल झाले आहेत. त्यांच्यावर पोलीस अधिकाऱ्यांना खंडणी वसूल करण्याचे आदेश दिल्याचा आरोप आहे. त्यामुळे त्यांची आज चौकशी होत आहे. या आरोपामुळेच देशमुखांना मंत्रिपद सोडावं लागलं होतं. देशमुख आजच्या चौकशीला कसे उत्तर देतात, यावर देशमुखांचे पुढील भवितव्य अवलंबून आहे.

यातच आता भाजपच्या नेत्यांनी अनिल देशमुख यांच्यावर टीकास्त्र डागायला सुरुवात केली आहे. राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांच्यासाठी येणारे दिवस कठीण असतील, असे सूचक वक्तव्य भाजप खासदार मनोज कोटक यांनी केले.त्यामुळे आता राजकीय वर्तुळात मनोज कोटक यांच्या वक्तव्याची चांगलीच चर्चा रंगली आहे.

अंबानी स्फोटक प्रकरण आणि मनसुख हिरेन हत्याप्रकरणाचा आतापर्यंतचा एकूण घटनाक्रम पाहता भाजप नेत्यांना अनेक गोष्टींची वेळेआधीची चाहुल लागल्याचे दिसून आले होते. त्यामुळे देशमुखांसाठी आगामी दिवस कठीण असतील, या मनोज कोटक यांच्या वक्तव्याचा अर्थ नक्की काय असावा, याविषयी सध्या तर्कवितर्क लढवले जात आहेत.

या अगोदर मुंबई उच्च न्यायालयात दिलासा न मिळाल्याने माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. उच्च न्यायालयाने या प्रकरणी सीबीआय चौकशीची परवानगी दिली होती. मात्र सर्वोच्च न्यायालयाकडूनही देशमुख यांना दिलासा मिळाला नव्हता. सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकार आणि अनिल देशमुख यांच्या याचिका फेटाळून लावल्या होत्या. त्यावेळी देशमुख यांच्यावर झालेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांची स्वतंत्र चौकशी करण्याची गरज असल्याचं सर्वोच्च न्यायालयाने सांगितले होते.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!