सिंधुदुर्ग : कोरोना संकट निवारण्यासाठी राज्यात कडक निर्बंध लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आज रात्री 8 वाजेपासून 1 मे पर्यंत राज्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. संपूर्ण राज्यात 144 कलम लागू राहील, अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. त्यांनी फेसबुक लाईव्हद्वारे जनतेला संबोधित करताना ही माहिती दिली आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या फेसबुक लाईव्ह संवादाला अनेकदा ट्रोल केलं जातं. भाजप नेत्यांपासून ते मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्य शैलीची टिंगल उडवल्याचे अनेकदा दिसून आले आहे. मंगळवारी झालेल्या उद्धव ठाकरेंच्या फेसबुक लाईव्हला देखील विरोधी नेत्यांनी लक्ष्य केलं आहे.
मुख्यमंत्र्यांना कितीही वेळा ऐका … काहीही समजत नाही. 3 idiots मधला एक डायलॉग आठवतो…. तुम केहना क्या चाहते हो??
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) April 14, 2021
भाजप नेते निलेश राणे यांनी थ्री इडियट्स या हिंदी चित्रपटातील एक डायलॉग टाकत मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे. ‘मुख्यमंत्र्यांना कितीही वेळा ऐका … काहीही समजत नाही. 3 idiots मधला एक डायलॉग आठवतो…. तुम केहना क्या चाहते हो??’ असं ट्विट निलेश राणे यांनी केलं आहे.
महत्वाच्या बातम्या
- राज्यात आजपासून लॉकडाऊन; काय सुरु, काय बंद ? वाचा एका क्लिकवर !
- परभणीमध्ये दोन पोलिसांचे कोरोनाच्या संसर्गाने निधन
- सीबीएससीचा मोठा निर्णय ! दहावीची परीक्षा रद्द, १२ वी ची परीक्षा पुढे ढकलली
- फडणवीसांच्या सगळ्या गोष्टी मला माहिती, त्यांचं केंद्रात अजिबात वजन नाही – नाना पटोले
- केंद्र सरकारच्या योजनांचा पैसाच देणार, मग राज्य सरकारची अतिरीक्त मदत कशी?


