Share

Uddhav Thackeray | ‘खड्ड्यांचे खोके, मोतोश्री ओके’, सत्ताधारी नेत्यांचा शिवसेना पक्षावर हल्ला

Published On: 

मुंबई : दरवर्षी प्रमाणे या वर्षीही पावसाळी अधिवेशन खूप रंगलं असल्याचं पाहायला मिळतं आहे. काल अधिवेशनाच्या दरम्यान सत्ताधारी आणि विरोधी पक्षनेत्यांमध्ये धक्काबुक्की झालेली पाहायला मिळाली होती. याच पार्श्वभूमिवर आज या अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे आजही नेते सडकून टोलेबाजी करतील असं दिसून येतं आहे. आता अधिवेशनाला आता सुरूवात झाली असून अशातच सत्ताधारी पक्षनेत्यांनी शिवसेना पक्षावर घोषणाबाजी करायला सुरूवात केली आहे.

सत्ताधाऱ्यांची शिवसेना पक्षावर घोषणाबाजी-

सत्ताधारी पक्षनेते जोरदार तयारी करून आले असल्याचं दिसून येतं आहे. त्यांनी शिवसेना पक्षावरही घोषणाबाजी करायला सुरूवात केली आहे. खड्ड्यांचे खोके, मोतोश्री ओके, अशी घोषणा सत्ताधारी नेते देत शिवसेना पक्षाला लक्ष्य केलं आहे. विधीमंडळाच्या पायऱ्यांवर शिंदे गट आणि भाजपचे पक्षनेते आंदोलन करत आहेत.

सत्ताधाऱ्यांचा आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा-

तसेच, सत्ताधारी नेत्यांनी शिवसेना पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे यांच्यावरही निशाणा साधला आहे. युवराजांची दिशा चुकली, असं म्हणत सत्ताधारी पक्षनेत्यांनी आदित्य ठाकरे यांना लक्ष्य केलं आहे. त्याचप्रमाणे सत्ताधारी त्याठिकाणी महाविकास आघाडीविरोधात घोषणाबाजी करत असल्याचंही पाहायला मिळतं आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विधिभवनाच्या आवारात दाखल-

दरम्यान, आज अधिवेशनाचा शेवटचा दिवस चांगलाच रंगला जाणार असल्याचं दिसून येतं आहे. विधिभवनाच्या आवारात महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दाखल झाले असल्याचं माहिती समोर येतं आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!