Share

Bapusaheb Gorthekar | माजी आमदार श्रीनिवास उर्फ बापूसाहेब देशमुख गोरठेकर यांचे दुःखद निधन

Published On: 

नांदेड :  महाराष्ट्र राज्यामध्ये सध्या राजकीय वातावरण चांगलंच तापलेलं दिसून येतं आहे. विरोधी पक्षनेते आणि सत्ताधारी पक्षनेत्यांमध्ये कोणत्याना-कोणत्या मुद्यावरून टोलेबाजी सुरूच असते. परंतू अशातच एक दु:खद घटना घडली असल्याचं समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि भोकर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार श्रीनिवास ऊर्फ बापूसाहेब गोरठेकर यांचं निधन झालं आहे.

उमरी येथे होणार अंत्यसंस्कार-

बुधवारी 24 ऑगस्ट रोजी म्हणजेच काल श्रीनिवास ऊर्फ बापूसाहेब देशमुख गोरठेकर यांची रात्री प्रकृती अचानक खालावली होती. त्यानंतर त्यांना नांदेड येथील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. परंतू उपचार सुरू असताना त्यांनी आपला अखेरचा श्वास घेतला असल्याचं समजतं आहे. श्रीनिवास ऊर्फ बापूसाहेब देशमुख गोरठेकर यांच्या निधनाने भोकर विधानसभा मतदारसंघामध्ये शोककळा पसरली असून, त्यांच्या पार्थिवावर आज 25 ऑगस्ट, गुरुवार रोजी दुपारी 4 वाजता गोरठा, तालुका उमरी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

भोकर तालुका मोठ्या नेतृत्वाला मुकला-

भोकर विधानसभा मतदारसंघाचे बापूसाहेब गोरठेकर यांनी दोनवेळा प्रतिनिधित्व केलं होतं. मतदारसंघात त्यांचा चांगलाच प्रभाव आणि चांगली पकड देखील होती. त्यामुळे भोकर तालुका एका मोठ्या नेतृत्वाला मुकला असल्याचं बोललं जात आहे. तसेच उमरी तालुक्यातील त्यांच्या मूळ गावी गोरठा येथे त्यांचे पार्थिव शरीर अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार असल्याचं समजतं आहे.

आदर्श नेता म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात ओळख-

दरम्यान,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला नांदेडमध्ये मोठं करण्यातही त्यांनी मोलाची भूमिका बजावली होती. नांदेड जिल्ह्याच्या राजकारणातील विविध पदे यशस्वीपणे निभावलेला एक आदर्श नेता म्हणून त्यांची जिल्ह्यातच नाहीतर संपूर्ण महाराष्ट्रात ओळख होती.
महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!