मुंबई : सध्या राज्यामध्ये पावसाळी अधिवेशन सुरू आहे. त्यामुळे विरोधी आणि सत्ताधारी पक्षनेत्यांमध्ये चांगलीच आरोप-प्रत्यारोपांची खेळी रंगू लागली आहे. अशातच महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजप पक्षावर हल्ला केला आहे.
उद्धव ठाकरे यांचा भाजपवर हल्लाबोल-
राष्ट्रीय पक्ष म्हणवून घेणाऱ्या भारतीय जनता पार्टीला सर्वकाही कमी पडत आहे. महाराष्ट्रासह संपूर्ण देशात दुसऱ्या पक्षांचे आमदार, खासदार, नेते चोरण्याचा त्यांचा एककलमी कार्यक्रम सुरू आहे, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. त्याचप्रमाणे हा भाजप पक्ष राष्ट्रीय पक्ष आहे की चोरबाजार? असा खोचक सवालही ठाकरे यांनी केला आहे.
भाजपला मुंबई मिळवण्याची हाव-
आचारविचार काहीही नसलेल्या भाजपला सत्तापिपासूप्रमाणे मुंबई मिळवण्याची हाव लागली आहे. परंतू मराठी माणूस त्यांची ती हाव कदापी पूर्ण होऊ देणार नाही, असा विश्वासही उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.
कंत्राटी कामगारांचा प्रश्न गंभीर झाला आहे-
राज्यात वीज कंत्राटी कामगारांचा प्रश्न गंभीर बनला झाला असून, यावरूनही उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिदि यांना लक्ष्य केले आहे. कंत्राटी कामगारांप्रमाणेच राज्याचे मुख्यमंत्रीही कंत्राटी आहेत. आपण त्या पदावर किती काळ राहणार हे त्यांनाच माहीत नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Atul Bhatkhalkar | तुमच्यावर बलात्काराचे आरोप झाले आणि त्याची चौकशीच झाली नाही-अतुल भातखळकर
- Shivsena । नवीन सरकारचा ट्रेलर; महाराष्ट्राला कोणता ‘पिक्चर’ दाखवणार?; शिवसेनेचा शिंदे गटावर हल्लाबोल
- Bapusaheb Gorthekar | माजी आमदार श्रीनिवास उर्फ बापूसाहेब देशमुख गोरठेकर यांचे दुःखद निधन
- Roshan and Saif Ali Khan | अभिनेता हृतिक रोशन आणि सैफ अली खान यांचा ‘विक्रम वेधा’चा टीझर प्रदर्शित
- Pratap Sarnaik । अमोल मिटकरींनी माकडचाळे केले नसते तर…; प्रताप सरनाईकांचा हल्लाबोल


