🕒 1 min read
मुंबई : महाराष्ट्र राज्यातील या वर्षीचं पावसाळी अधिवेशन सध्या सुरू आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही अधिवेशन खूप गाजलं आहे. सत्ताधारी आणि विरोधी पक्षनेते एकमेकांवर टोलेबाजी करताना पाहायला मिळतं आहे. अशातच काल विधानभवनामध्ये विरोधी पक्षाने अंतिम आठवडा प्रस्तावात बलात्कार, घरफोड्यांवर भाष्य केले. त्यांच्या प्रस्तावावर बोलताना भारतीय जनता पार्टी चे आमदार अतुल भातखळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार धनंजय मुंडे यांच्यावर एक आरोप केला आहे.
तुम्हाला बलात्कार, घरफोड्यांवर बोलण्याचा अधिकार नाही-
तुमच्यावर बलात्काराचे आरोप झाले आणि त्याची चौकशीच झाली नाही, असं म्हणत अतुल भातखळर यांनी अप्रत्यक्षरित्या धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधला आहे. भातखळकर विरोधी पक्षांच्या अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलताना त्यांनी हा आरोप केला आहे. अडीच वर्षात तुम्ही सत्तेचा वापर करून बलात्कार करणाऱ्यांना प्रतिष्ठा आणि संरक्षण देण्याचं काम केलंत. त्यामुळे तुम्हाला यावर बोलण्याचा कोणता अधिकार नसल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.
बलात्काराचा आरोप केलेल्यांवर दबाव टाकण्यात आला-
पुढे ते असंही म्हणाले की, ज्यांनी बलात्काराचा आरोप केला त्यांना पोलीस संरक्षण नाही, उलट त्यांच्यामागे पोलीस लावण्यात आले. त्यांच्या गाडीत पिस्तुल ठेवण्यात आलं. अॅट्रोसिटीचे गुन्हे दाखल करण्यात आले. त्यांच्यावर प्रचंड दबाव टाकण्यात आला. असं असताना तुम्ही अंतिम आठवडा प्रस्तावात बलात्कार, घरफोड्यांवर बोलत आहात.
नैतिक महाराष्ट्राची मान खाली गेली –
बलात्काराचा आरोप असलेला मनुष्य आरोपी असतो. त्याचा त्याच्या जातीशी काय संबंध आहे? मात्र, समर्थन केलं गेलं. हे महाराष्ट्राच्या इतिहासात कधीही घडलं नव्हत. ते महाराष्ट्रानं पाहिलं. राज्याच्या एका फार वरिष्ठ नेत्याने म्हटलं हे खरंय की बलात्काराचे आरोप झाले, परंतू तक्रार करणाऱ्या महिलेचं चारित्र्य तपासण्याची गरज आहे. त्या दिवशी नैतिक महाराष्ट्राची मान खाली गेली असल्याचंही भातखळकरांनी भवनामध्ये बोलून दाखवलं.
महत्वाच्या बातम्या :
- Jayant Patil। भाजप तुमचा अपमान करतयं, तुम्ही आमच्याकडे या मुख्यमंत्री करू; जयंत पाटलांची खुली ऑफर
- Bhagat Singh Koshyari | स्वातंत्र्यासाठी गांधींचं एकतर्फी समर्थन करू नका, राज्यपालांचे वादग्रस्त वक्तव्य
- Ramdas Athawale | हे काय बिहार, उत्तर प्रदेश आहे का? आमदारांच्या धक्काबुक्कीवर रामदास आठवले संतापले
- Uday Samant | आज पायऱ्यांवर आंदोलन करणाऱ्यांपैकी 15 जण शिंदे गटात येणार; उदय सामंतांचा दावा
- Assembly Session 2022 | मी काय गोट्या खेळतोय का?; सुहास कांदे विरोधकांवर संतापले
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
