🕒 1 min read
मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी मुख्यमंत्र्यांबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यावरुन राज्यात राजकीय रणकंद सुरु आहे. राणेंच्या टीकेनंतर राज्यभर त्यांच्याविरोधात निदर्शने करण्यात आली. सेना-भाजपच्या नेत्यांमध्ये टीकांचे धारदार बाण एकमेकांवर सोडले जात आहेत.
नारायण राणेंना पोलिसांनी अटक देखील केली होती. तर राणेंची अटक ही पोलिसांवर दबाव टाकून करण्यात आल्याचा आरोप भाजपने केला आहे. राज्यात सध्या शिवसेना विरुद्ध भाजपा असं चित्र पाहायला मिळतं आहे. दरम्यान या सर्व प्रकरणावर आज उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत हे एका वृत्तवाहिनीसोबत बोलत होते.
यावेळी बोलताना ते म्हणाले कि, ‘केंद्रातील चार मंत्र्यांची जन आशीर्वाद यात्रा राज्यात सुरू आहे. पण, फक्त कोकणातील जन आशीर्वाद यात्रा गाजत आहे. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आमच्यासाठी देवासारखे आहेत. त्यामुळे त्यांच्याबद्दल कोणी आगळीक केली वा अनुद्गार काढले तर शिवसैनिक ते खपवून घेणार नाही. भाजपा नेते नारायण राणे यांच्या यात्रेदरम्यान जशी अॅक्शन येईल, तशी रिअॅक्शन शिवसेनेकडून होईल.’ असा इशाराच यावेळी त्यांनी राणेंना दिला आहे.
तसेच यावर पुढे बोलताना ते म्हणाले कि, ‘खरे तर जनतेचे आशीर्वाद चांगल्या कामातून मिळावे यासाठी जन आशीर्वाद यात्रेचे आयोजन करावे. शिवसेनेला कोणीही शह देऊ शकत नाही.’ असे देखील त्यांनी आवर्जून सांगितले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘ओबीसींच्या राजकीय आरक्षणाला आमचा विरोध नाही’, आ.विनायक मेटेंचे स्पष्टीकरण
- ओबीसी आरक्षण बैठकीला वांझोटी म्हणणाऱ्यांवर विजय वडेट्टीवार संतापले, म्हणाले..
- ..तर पोलिसांनी भाजपा नेत्यांचे मुसक्या आवळाव्यात, कुठलीही दया दाखवू नये-सचिन सावंत
- ‘नेत्यांना पक्षात घेऊन वापरायचे, हेच भाजपचे धोरण’, जयंत पाटलांची टीका
- ‘विमा कंपन्या आणि केंद्र सरकारमध्येच सेटलमेंट’, शिवसेना खासदाराचा गंभीर आरोप
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
