🕒 1 min read
औरंगाबाद: महाराष्ट्रासह देशामध्ये बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल आदरस्थान आहे. मराठी माणसाला न्याय देण्यासह १९९५ ते १९९९ साली सत्तेचे सूत्रे आपल्या हाती असतांना राज्यात अनेक जनहितार्थ निर्णय घेण्यात आले. सर्वसामान्यांना न्याय देण्यासह वाडीवस्त्यांचा विकास साधण्यात आला. त्याच पद्धतीने आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काम करीत असून त्यांच्या कार्यपद्धती मुळेच सलग दुसऱ्यांदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(Udhav Thackrey) देशातील लोकप्रिय मुख्यमंत्री ठरले आहेत असे प्रतिपादन राज्यमंत्री अब्दुल सत्तार(Abdul Sattar) यांनी रविवारी केले.
हिंदुहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त सिल्लोड नगर परिषदेच्या माध्यमातून रविवारी येथील स्व. बाळासाहेब ठाकरे चौक येथे स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक व सुशोभीकरणाचे भूमिपूजन राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्याहस्ते संपन्न झाले. याप्रसंगी राज्यमंत्री अब्दुल सत्तार बोलत होते. ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण हा वंदनीय बाळासाहेबांनी दिलेल्या मूलमंत्राचे पालन शिवसैनिकांकडून कायम होत आले आहेत.
राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी मतदारसंघात विकास कामांसह सामाजिक उपक्रम राबविले असे स्पष्ट करीत बाळासाहेब ठाकरे म्हणजे एक ऊर्जा स्थान असल्याचे जिल्हाप्रमुख नरेंद्र त्रिवेदी म्हणाले. सिल्लोड नगर परिषदेने वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीची आठवण ठेवून आज बाळासाहेबांच्या चौकाचे सुशोभीकरण करण्यासह येथे स्मारक उभारण्याचा निर्णय घेतला याबद्दल आभार व्यक्त करीत जिल्हाप्रमुख नरेंद्र त्रिवेदी यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीच्या उपस्थितांना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमास नगरसेवक विठ्ठल सपकाळ, रईस पठाण, शंकरराव खांडवे आदी उपस्थित होते.
महत्त्वाच्या बातम्या
-
डेव्हिड वॉर्नरने केलेल्या श्रीवल्ली डान्सस्टेप्सवर, अल्लू अर्जूनने केली कमेंट
-
“मुख्यमंत्री ठाकरे काल जनतेसमोर आले अन् विरोधकांचे धाबे दणाणले”
-
“हिंदुत्वावर व्याख्यान देण्यापूर्वी उद्धव ठाकरेंनी आत्मपरीक्षण करावे”, रामदास कदमांची खोचक टीका
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
