मुंबई : पुन्हा एकदा क्रिकेटर डेव्हिड वॉर्नरचे (David Warner) भारतावरचं प्रेम एका गाण्याच्या स्टेप्स करत व्यक्त केले आहे. डेव्हिड वॉर्नरने बऱ्याचदा सिद्ध केले की, त्याची प्रतिभा क्रिकेटच्या खेळाच्या पलीकडे आहे. वॉर्नर अनेकदा बॉलीवूड आणि टॉलिवूडचे (Bollywood and Tollywood) डान्स-डायलॉग व्हिडिओ त्याच्या इंस्टाग्रामवर कॉपी करून शेअर करतो. बऱ्याच क्रिकेटर्सवर अल्लू अर्जुनच्या (Allu Arjun) ‘पुष्पा’ चित्रपटातील (Pushpa film) गाण्याची भुरळ घातली आहे. आता डेव्हिड देखील यातून सुटू शकला नाही.
दरम्यान डेव्हिड वॉर्नरनेही ‘पुष्पा’ चित्रपटातील ‘श्रीवल्ली..’ या गाण्यातील स्टेपची कॉपी केली आहे. डेव्हिड वॉर्नरने या स्टेपची कॉपी केली आहे की हा त्याचा व्हिडिओ पाहून चक्क अल्लू अर्जुन देखील त्यास प्रतिक्रिया देण्यापासून स्वत:ला वाचवू शकला नाही. यापूर्वी रवींद्र जडेजा, शिखर धवन, इशान किशन, सूर्यकुमार यादव आणि माजी प्रशिक्षक आर श्रीधर या क्रिकेटपटूंनीही ‘पुष्पा’ चित्रपटातील संवाद आणि डान्स स्टेप्स कॉपी केल्या आहेत.
डेव्हिड वॉर्नरने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून (Instagram) व्हिडीओ शेअर केलं आहे. या व्हिडीओत तो श्रीवल्ली या गाण्यात अल्लू अर्जुनच्या चित्रपटातील खास स्टेप्स करतांना दिसतोय. विशेष म्हणजे चित्रपटात अल्लू अर्जुनने केलेल्या चपलासह अगदी त्याच स्टेप्स केल्याने सर्वांचे लक्ष वेधत आहे. या व्हिडिओवर चाहत्यांसह क्रिकेटपटू आणि अल्लू अर्जुननेही कमेंट केली आहे. अल्लू अर्जुनच्या या पोस्टवर कमेंट केल्यानंतर वॉर्नरने म्हणाला की, पुढच्या वेळी मी शहरात येईन तेव्हा तुम्हाला मला भाऊ अल्लू अर्जुन ‘सामी सामी’ दाखवावे लागेल.
https://www.instagram.com/reel/CY_KjWaJ-fh/?utm_source=ig_web_copy_link

डेव्हिड वॉर्नरने नुकत्याच संपलेल्या अॅशेसमध्य ऑस्ट्रेलियासाठी आघाडीच्या क्रमवारीत मोलाची कामगिरी केली होती. तसेच पहिल्या काही कसोटीत चांगला ही खेळला होता. आयपीएल २०२२ मध्ये त्याला कोणत्याही फ्रेंचायझीने कायम ठेवलेले नाही. अशा परिस्थितीत तो आयपीएल २०२२ च्या मेगा लिलावात सहभागी होणार आहे. २०२१ च्या T20 विश्वचषक स्पर्धेत सातत्याने धावा करण्यासह डावखुरा हा चांगला फॉर्ममध्ये आहे. मात्र त्याने नुकतच शेअर केलेल्या या व्हिडीओने सर्वांचे लक्ष वेधले आहे.
महत्वाच्या बातम्या:
- “हे राज्य नेमके कोणते मुख्यमंत्री चालवतात?”, आ. अतुल भातखळकरांचा सवाल
- “भाजपने ज्या ज्या पक्षासोबत हातमिळवणी केली त्याला संपवण्याचा प्रयत्न त्यांनी केला”, नवाब मलिकांचा हल्लाबोल
- तर देशात शिवसेनेचा पंतप्रधान असता – संजय राऊत
- “हिंदुत्वावर व्याख्यान देण्यापूर्वी उद्धव ठाकरेंनी आत्मपरीक्षण करावे”, रामदास कदमांची खोचक टीका
- “अनपढ लोकांवर काय बोलायचं?, मी बावनकुळेंना ओळखत नाही”, नाना पटोलेंची टीका
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

