🕒 1 min read
मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे(Balasaheb Thackeray) यांची काल(२३ जाने.)९६ वी जयंती होती. यानिमित्ताने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) यांनी राज्यभरातील शिवसैनिकांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. तसेच यावेळी त्यांनी भाजपवर निशाणा साधत टीकास्त्रांचा वर्षावही केला. त्यामुळे भाजप नेत्यांकडून ठाकरेंवर निशाणा साधण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर भाजप नेते अतुल भातखळकर(Atul Bhatkhalkar) यांनी ठाकरे सरकारच्या राज्यात मुघल कबरीतून पुन्हा अवतरल्याची खोचक टीका केली आहे.
यासंदर्भात भातखळकरांनी ट्विट केले असून ट्विटमध्ये ते म्हणाले आहेत की,’ज्वलंत हिंदुत्ववादी मुख्यमंत्र्यांच्या सरकारमध्ये साकारतायत वीर टिपू उद्याने. यांच्या बोगस बेगडी विचारधारेचे असे खंडीभर पुरावे देता येतील. ठाकरे सरकारच्या राज्यात मुघल कबरीतून पुन्हा अवतरलेत.’
ज्वलंत हिंदुत्ववादी मुख्यमंत्र्यांच्या सरकारमध्ये साकारतायत वीर टिपू उद्याने. यांच्या बोगस बेगडी विचारधारेचे असे खंडीभर पुरावे देता येतील. ठाकरे सरकारच्या राज्यात मुघल कबरीतून पुन्हा अवतरलेत. pic.twitter.com/pXVCjV83CR
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) January 23, 2022
दरम्यान, पुढे ते म्हणाले आहेत की, ठाकरे सरकारवर मुघल ए आझम-२ काढता येईल. तसेच असे हिरवे वातावरण गेल्या दोन वर्षात महाराष्ट्रात निर्माण झाले आहे, असेही भातखळकर म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या
-
“मविआ सरकारच्या राज्यात प्रत्येक मंत्री स्वतःला मुख्यमंत्री समजतो”, भातखळकरांचे टीकास्त्र
-
राज्य सरकार बरखास्त करण्यापेक्षा केंद्रातील सरकार बरखास्त करा-नाना पटोले
-
“देशात एकच मोदी नाहीत, निरव मोदी, ललित मोदीही आहेत, ‘त्या’ घटनेवरून नाना पटोले संतापले
-
पाल्यांना शाळेत पाठवणे जोखमीचे वाटत असेल तर पाठवू नये- आदित्य ठाकरे
-
“लवकरच मुख्यमंत्री ठाकरे अॅक्शन मोडमध्ये दिसणार”, विरोधकांच्या टीकेवर आदित्य ठाकरेंचे प्रत्युत्तर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
