Share

खुद्द उद्धव ठाकरेंनी फडणवीस सरकारचं केलं कौतुक, म्हणाले…

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : या वर्षाची सुरुवात ही मुंबईकरांसाठी खास ठरत आहे. मुंबईतील विकासकामांना वेग आला आहे. काल, मुंबई महापालिकेत हेरिटेज वॉकची सुरुवात करण्यात आली. आज सकाळी मुंबईकरांसाठी जिव्हाळ्याच्या मुंबई लोकलने प्रवास करण्यासाठीचा निर्णय घेण्यात आला. तर, संध्याकाळी मुंबई मेट्रोच्या मेड इन इंडिया कोचचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. विशेष म्हणजे, ही मेट्रो चालकरहीत स्वयंचलित पद्धतीने धावणाऱ्या आहेत.

या कार्यक्रमाला उद्धव ठाकरे यांच्यासह पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर, महापौर किशोरी पेडणेकर उपस्थित होते. या कार्यक्रमाचा भाषणामध्ये ठाकरेंनी दरेकरांचं नाव घेऊन फडणवीस सरकारचं कौतुक देखील केलं आहे. ‘यापूर्वीच्या सरकारनेही चांगलं काम केलं.’ असे उद्गार काढले आहेत.

‘प्रविण दरेकर, तुम्हीपण बसला आहात. यापूर्वीच्या सरकारनेही चांगलं काम केलं. असं नाही की, यापूर्वीच्या सरकारने चांगलं काम केलं नाही, असं म्हणणारा मी नतभ्रष्ट नक्कीच नाही. पूर्वीच्या सरकारने जे काम केलं ते नाकारण्याचा नतभ्रष्टपणा मी करणार नाही.’ असं ते म्हणाले. तर, ‘पूर्वीच्या सरकारपेक्षा अधिक गतीने मी ते काम पूर्ण करतोय’ असा टोला देखील उद्धव ठाकरे यांनी भाजपला लगावला आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!