Share

मराठा मोर्चामधील आंदोलकांचे गुन्हे मागे घेणार-गृहमंत्री अनिल देशमुख

Published On: 

औरंगाबाद : मागील काही वर्षांपासून मराठा आरक्षणासाठी विविध पद्धतीने आंदोलन सुरू आहे. मागण्या पूर्ण करण्यासाठी आंदोलक आंदोलन करत असताना त्यांच्यावर अनेक ठिकाणी गुन्हे दाखल झाले आहे. त्यातील सौम्य स्वरूपाचे गुन्हे मागे घेणार असल्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

आरक्षणासाठी मराठा समाज आग्रही आहे सरकार दरबारी अनेक मोर्चे धरणे असे विविध स्वरूपाची आंदोलने गेल्या काही वर्षापासून मराठा समाज करीत आहे. त्यातच 2014 ते 2019 या युती सरकारच्या काळातील मराठा समाजाच्या आंदोलकांवर दाखल झालेले गुन्हे देखील मागे घेण्यात येणार आहे.

मात्र आंदोलनादरम्यान दाखल झालेले गंभीर गुन्हे मागे घेण्यात येणार नसल्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले. त्याबरोबरच यात मालमत्तेचे नुकसान, सरकारी कर्मचारी, पोलीस, पत्रकार यांच्यावरील हल्ले यासारखे गंभीर स्वरूपाचे गुन्हे मागे घेण्यात येणार नाही असे देशमुख यांनी स्पष्ट केले.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!