Share

‘रामायण काल्पनिक असल्याचा दावा करणाऱ्या पक्षाच्या लोकांना हिशोब मागण्याचा हक्क नाही’

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : अयोध्येतील राम मंदिराच्या प्रत्यक्ष निर्माण कार्यास सुरुवात झाली आहे. तर, मंदिर उभं करण्यासाठी लागणार खर्च हा करोडो रामभक्तांमार्फत संकलित केला जात आहे. विश्व हिंदू परिषदेने राम मंदिर निर्माण सहयोग अभियान सुरु केले आहे. भाजप, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने देखील निधी संकलनासाठी सक्रिय सहभाग घेतला जात असून देशभरात हे अभियान राबविले जात आहे.

राज्यातील भाजप नेत्यांसह राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी देखील राम मंदिर निर्माणासाठी निधी उभा करण्यासाठी पुढाकार घेतला असतानाच काँग्रेसने या निधी संकलन अभियानावर गंभीर आरोप केले आहेत. काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी ‘राम मंदिराचा चंदा हा भाजपचा धंदा’ असल्याचं वक्तव्य केलं आहे.

‘राम मंदिर प्रक्रिया सुरू आहे. राम मंदिर निर्मितीकर्ता निधी संकलन कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. त्यात लोक सहभागी होत आहेत. पण ह्या कार्यक्रमात भाजप आणि RSS(राष्ट्र्रीय स्वयंसेवक संघ) चा सहभाग चिंताजनक आहे. भाजपने राम मंदिर मुद्दा फक्त राजकारणासाठी वापरला आहे. राम मंदिर चंदा हा भाजपचा धंदा आहे,’ असा गंभीर आरोप सचिन सावंत यांनी केला आहे.

यासोबतच त्यांनी, ‘राज्य सरकारने राज्यातील भाविकांची लुबाडणूक होऊ नये यासाठी जो भाजपने किंवा आरएसएसने जो निधी संकलित केला असेल त्याची चौकशी व्हावी’ अशी मागणी देखील केली आहे. सचिन सावंत यांच्या या आरोपांवर भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

‘राम मंदिरावर श्रद्धा आणि ज्या हिंदुत्ववादी संघटनामुळे राम मंदिर प्रत्यक्षात येत आहे त्यांच्यावर विश्वास असल्यामुळे लोक मंदिरासाठी देणग्या देतायत. रामायण काल्पनिक असल्याचा दावा करणाऱ्या पक्षाच्या लोकांनी याचा हिशोब मागण्याचे कारण नाही.’ असा घणाघात अतुल भातखळकर यांनी काँग्रेससह सचिन सावंत यांच्यावर केला आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!