Share

#COVID19 शी लढा देण्याचा मंत्र ‘दवाई भी कडाई भी’ नक्की लक्षात ठेवा : पंतप्रधान मोदी

Published On: 

नवी दिल्ली : महिन्याच्या शेवटच्या रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी रेडीओवरून मन की बात या कार्यक्रमातून देशातील जनतेशी संवाद साधत असतात. यामध्ये ते अनेक विषयांवर भाष्य करत असतात. आज २८ मार्च ला मोदींनी याच कार्यक्रामातून जाणतेही संवाद साधला पंतप्रधान मोदींची ही या वर्षातली तिसरी आणि एकूण 75 वी मन की बात होती. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, आपल्या सर्वांसाठी ही अभिमानाची बाब आहे की आज भारतात, जगातील सर्वात मोठा लसीकरण कार्यक्रम चालविला जात आहे.

पंतप्रधान मोदी म्हणाले की, गेल्या वर्षी मार्च महिन्यातच देशाने पहिल्यांदा जनता कर्फ्यू हा शब्द ऐकला. महान देशातील जनतेच्या शक्तीची अनुभूती म्हणजे जनता कर्फ्यू संपूर्ण देशासाठी आदर्श उदाहरण ठरला. शिस्तीचं हे अभूतपूर्व असं उदाहरण होतं. येणाऱ्या पिढ्यांना गोष्टींचा गर्व वाटेल, असं ते म्हणाले. कोरोना योद्ध्यांच्या सन्मानार्थ आपण वाजवलेल्या टाळ्या, थाळ्या आणि लावलेले दिवे, हे सगळं करोना योद्ध्यांच्या ह्रदयाला स्पर्श करून गेलं. त्यामुळेच कोरोना योद्धे संपूर्ण वर्षभर न थकता, न थांबता सेवा करत राहिले. देशाच्या प्रत्येक नागरिकाचा प्राण वाचवण्यासाठी लढत राहिले. मागील वर्षी आपल्यासमोर प्रश्न होता की, कोरोना लस कधी येणार? आता आपल्या सगळ्यांसाठी अभिमानाची गोष्ट म्हणजे भारत जगातील सर्वात मोठी लसीकरण मोहीम राबत आहे, असं मोदी म्हणाले.

पंतप्रधान मोदी म्हणाले की, स्वातंत्र्याच्या लढाईत आपल्या स्वातंत्र्यसैनिकांनी अतोनात कष्ट सहन केले. देशासाठी बलिदान देणे हे आपले कर्तव्य आहे असे ते मानत असत. त्यांच्या त्याग आणि बलिदानाच्या अमर कहाण्या आपल्याला आता सदैव कर्तव्याच्या मार्गाने जाण्यासाठी प्रेरित करत राहोत, असं ते म्हणाले. कोरोनाच्या या सर्व परिस्थिती दरम्यान, #COVID19 शी लढा देण्याचा मंत्र पण नक्की लक्षात ठेवा.’दवाई भी – कडाई भी’ ! आणि आपल्याला फक्त बोलायचेच आहे असे नाही, आपल्याला ते प्रत्यक्ष आचरणात आणायचे आहे, आणि लोकांनाही ‘दवाई भी कडाई भी’ असे वागण्यासाठी वचनबद्ध करायचे आहे, असं ते म्हणाले.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!