अहमदाबाद : राज्यात राष्ट्रवादी,शिवसेना आणि कॉंग्रेस हे एकत्रित येत महाविकास आघाडी सरकार सत्तेत आले. मात्र गेल्या काही दिवसांपासून सचिन वाझे प्रकरण परमबीर सिंग यांचा लेटर बॉम्ब यामुळे सरकार कुठेतरी अडचणीत आले आहे. यावरून महाविकास आघाडीत खटके उडायला सुरवात झाली आहे. अशातच गुजरातमधून राज्याच्या राजकारणाला हलवून टाकणारी एक बातमी समोर आली आहे.
राष्ट्रवादीचे दिग्गज नेते आणि माजी केंद्रीय मंत्री प्रफुल पटेल यांनी भाजपच्या निकटवर्तीय बड्या उद्योगपतीची भेट घेतल्याची माहिती आहे. अहमदाबादच्या फार्महाऊसवर ही भेट झाली. या भेटीचे परिणाम महाराष्ट्राच्या राजकारणावर या भेटीचे परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अहमदाबादमधील फार्महाऊसवर 26 मार्चच्या रात्री 9.30 वाजता ही भेट झाल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे पटेलांची संबंधित उद्योजकाशी भेट झाली, त्यावेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारही त्यावेळी अहमदाबादेतच होते. मात्र या बैठकीला पवार उपस्थित होते का, याची पुष्टी मिळालेली नाही.
दुसरीकडे, शरद पवार आणि प्रफुल पटेल यांची केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे दिग्गज नेते अमित शाह यांच्यासोबत गुप्त चर्चा झाल्याची माहिती एका गुजराती वृत्तपत्राने दिली आहे. शांतिग्राममधील गेस्टहाऊसला पटेल आणि पवार प्रायव्हेट जेटने आले होते, असा दावा या बातमीत करण्यात आला आहे. अँटिलिया प्रकरणात राष्ट्रवादीचे नेते असलेले गृहमंत्री अनिल देशमुख अडकल्याने राष्ट्रीय पातळीवरही दबाव वाढत आहे. या पार्श्वभूनीवर ही भेट झाल्याची चर्चा आहे. याचे परिणाम राज्याच्या राजकारणाव होण्याची चिन्हं वर्तवली जात आहेत.
या भेटीच्या बातमीनंतर आता राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. भाजपचे नेते आणि माजी खासदार निलेश राणे यांनी या भेटीवर प्रतिक्रिया देत शरद पवार यांच्यावर टीका केली आहे. ‘शरद पवार साहेब जर अमित शहा साहेबांना भेटले तर त्यात नवल वाटायचं कारण नाही कारण शरद पवार साहेब कधी कोणाला भेटतील याचा नेम नसतो. शरद पवार ते आहेत जे शिवाजी पार्कला स्व. बाळासाहेबांचे स्मारक होत आहे ती जागा एनसीपी कार्यालय करतील आणि एनसीपी कार्यालय बाळासाहेबांचे स्मारक करतील’. असा टोला निलेश राणे यांनी लगावला आहे.
शरद पवार साहेब जर अमित शहा साहेबांना भेटले तर त्यात नवल वाटायचं कारण नाही कारण शरद पवार साहेब कधी कोणाला भेटतील याचा नेम नसतो. शरद पवार ते आहेत जे शिवाजी पार्कला स्व. बाळासाहेबांचे स्मारक होत आहे ती जागा एनसीपी कार्यालय करतील आणि एनसीपी कार्यालय बाळासाहेबांचे स्मारक करतील.
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) March 28, 2021
दरम्यान, यावर आता राष्ट्रवादी कॉंग्रेसने पहिली प्रतिक्रिया दिली आहे. राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी या भेटीच्या वृत्ताचे खंडन केले आहे. ‘शरद पवार आणि प्रफुल्ल पटेल हे अहमदाबादमधून थेट मुंबईला आले. ते कोणालाही भेटले नाहीत. मात्र, आता एका गुजराती दैनिकात त्यांनी अमित शाह यांची भेट घेतल्याची बातमी आली आहे. हे भाजपचे षडयंत्र आहे. शरद पवार यांनी अमित शाह यांची भेट घेतल्याची बातमी निव्वळ अफवा आहे’, असे नवाब मलिक म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या
- क्रिकेटपटू मिताली राजने मानले पंतप्रधान मोदींचे आभार
- चिंताजनक! नांदेड जिल्ह्यात कोरोनाचे आणखी १६ बळी; १०७३ रुग्ण
- अहमदाबाद येथे अमित शहा-शरद पवार यांची भेट ? राष्ट्रवादीची मोठी प्रतिक्रिया…
- #COVID19 शी लढा देण्याचा मंत्र ‘दवाई भी कडाई भी’ नक्की लक्षात ठेवा : पंतप्रधान मोदी
- ‘मन की बात’ कार्यक्रमात मोदींकडून खेळाडूंचं कौतुक
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

