Share

‘उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री बनायचं नव्हतं मीच त्यांचा हात हातात घेतला आणि वर केला’

Published On: 

🕒 1 min read

पुणे : उध्दव ठाकरेंना मुख्यमंत्री बनायचं नव्हतं तर का झाले?, असं भाजपचे नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केलं. त्यांच्या या वक्तव्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी फडणवीसांना उत्तर देत निशाणा साधला आहे. शरद पवार पिंपरी चिंचवड दौऱ्यावर असून त्यावेळी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

उध्दव ठाकरे मुख्यमंत्री बनायला तयार नव्हते. मी त्यांचा हात वर केला. आपल्या जुन्या मित्राच्या चिरंजावाला संधी द्यावी यासाठी मी त्यांचा हात वर केला आणि म्हणालो हेच मुख्यमंत्री होतील. हातातली सत्ता गेली म्हणून फडणवीस असे आरोप करतात. सत्ता गेल्याचं दुख त्यांना आवरेनासं झालंय.

अजित पवार यांना मुख्यमंत्री करण्याबाबत सध्या काही विचार नाही असेही ते म्हणाले. ‘आघाडी सरकार बनविण्यात माझाही सहभाग असून कितीही छापेमारी झाली तरी हे सरकार ढासळणार नाही’, असेही शरद पवारांनी स्पष्ट केले आहे.

अजित पवारांच्या तीन भगिनींच्या घरी इनकम टॅक्स विभागाने छापे मारले. चौदा-पंधरा व्यक्तींच्या पथकाने छापा टाकला. आता मध्यम वर्गीयांच्या घरात पाच दिवस थांबले मग त्यांचा पाहुणचार कसा करायचा असा प्रश्न पडतोच. शेवटी यात अजित दादांचे नाव आहे का? त्यामुळं माझा आक्षेप हा आहे की चौकशी करा पण त्यानंतर काम संपताच निघून जावं ना, पाच दिवस पाहुणचार घेऊ नये. एखादा दिवस ठीक आहे. पण इतके दिवस थांबल्यावर पाहुण्यांना हाकलून द्यायला हवं. पण यात पाहुण्यांचा दोष नव्हता त्यांना हाताळणाऱ्यांची ही चूक आहे, असंही शरद पवार म्हणाले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!